Pushpak Express robbery and rape case; आणखी चार दराेडेखाेर गजाआड, दाेघे स्वत:हून हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 07:24 AM2021-10-11T07:24:57+5:302021-10-11T07:25:27+5:30

Pushpak Express robbery and rape case; लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी इगतपुरी ते कसारादरम्यान दरोडा घालून एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून आणखी चार आराेपींना कल्याण लाेहमार्ग पाेलिसांनी अटक केली आहे़

Pushpak Express robbery and rape case; Four more Robber were arrested | Pushpak Express robbery and rape case; आणखी चार दराेडेखाेर गजाआड, दाेघे स्वत:हून हजर

Pushpak Express robbery and rape case; आणखी चार दराेडेखाेर गजाआड, दाेघे स्वत:हून हजर

Next

कसारा : लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी इगतपुरी ते कसारादरम्यान दरोडा घालून एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून आणखी चार आराेपींना कल्याण लाेहमार्ग पाेलिसांनी अटक केली आहे़ पळून गेलेल्या आराेपींपैकी दाेघे शनिवारी रात्री कल्याण लाेहमार्ग पाेलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाले, तर दाेघांना इगतपुरी पाेलिसांनी रात्रभर शाेधमाेहीम राबवून अटक केली. त्यांना रविवारी सकाळी कल्याण लाेहमार्ग पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एक्स्प्रेसमध्ये धुडगूस घालून पळून जाताना चार दराेडेखाेरांना प्रवाशांनीच पकडून पाेलिसांच्या ताब्यात दिले हाेते. या घटनेत प्रतिकार करणारे काही प्रवासी जखमी झाले हाेते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना कल्याण लाेहमार्ग पाेलीस ठाण्यात जबाब नाेंदवण्यासाठी पाठवले. त्यांनी दिलेल्या तक्रारींनुसार आठ आराेपींवर कल्याण लाेहमार्ग पाेलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झाले आहेत. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी वसंत पथवे, सचिन शिंदे, पोलीस कर्मचारी रुद्रे, महिरे, पिठुले  यांनी रात्रभर शोधमोहीम राबवून मुख्य आरोपी राहुल आडोळे ऊर्फ राहुल्या (रा. टाके) आणि काशिनाथ तेलंग (रा. घोटी) यांना अटक केली. या घटनेतील सर्व आठ आराेपींना अटक झाली आहे. अर्शद खान, प्रकाश पारधी, किशोर सोनावणे, आकाश शेणारे, धनंजय भगत ऊर्फ गुड्डू अशी इतर अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एकाचे नाव समजू शकलेले नाही. याप्रकरणी आरोपींवर लूटमार, बलात्कार, महिलांची छेड आणि बेकायदा प्रवास अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असल्याचे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी वाल्मीक शार्दूल यांनी सांगितले. पुढील तपास कल्याण लाेहमार्ग पाेलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शार्दूल करीत आहेत. दरम्यान, आरोपी हे इगतपुरी ते कसारा-कल्याण दररोज वेगवेगळ्या गाड्यांतून फेरीवाले बनून प्रवास करीत असल्याचे इगतपुरी रेल्वे स्थानकातील काही प्रत्यक्षदर्शींकडून समजते.
 

Web Title: Pushpak Express robbery and rape case; Four more Robber were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.