मानखूर्दमध्ये दोन कुटुंबांत भांडण, गोळीबारात महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 11:09 PM2023-04-29T23:09:39+5:302023-04-29T23:33:42+5:30
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कुटुंबांमध्ये भांडण झाल्यानंतर गोळीबार झाला.
मुंबई: मानखुर्द येथील इंदिरानगर मंडला परिसरात दोन कुटुंबांमध्ये भांडण होऊन झालेल्या गोळीबारात फरजाना इरफान शेख
(३१) नामक महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ७.१८ च्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गोळीबार होत असल्याचा फोन आला तेव्हा ही बाब उघड झाली. फोन करणाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीने महिलेवर गोळीबार केला.
शेखला आरोपींनी तिच्या छातीजवळ गोळी मारली. शेखच्या वडिलांचे नाव मोहम्मद इसरार चौधरी (४८), जे घटनास्थळी होते, त्यांनी गोळीबार करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला, ज्याचे नाव पोत्या उर्फ सोनू सिंग असे असल्याची माहिती आहे. ज्या दोन कुटुंबांमध्ये भांडण झाले ते शेजारी होते. मात्र गोळीबाराचा हेतू अस्पष्ट आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करून सिंग तात्काळ घटनास्थळावरून पळून गेला असून या गुन्ह्यामागील हेतूही अद्याप अस्पष्ट आहे.
तपासासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले, तर हत्येचा सुगावा शोधण्यासाठी जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजचा वापर केला जात आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून अधिक तपास सुरू आहे.