कासारवाडीत विनयभंग करून तलावारीने वार ; परस्परविरोधी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 04:05 PM2019-09-18T16:05:20+5:302019-09-18T16:06:46+5:30
जागेवरून दोन गटांमध्ये वाद झाला....
पिंपरी : जागेवरून दोन गटांमध्ये वाद झाला. तलवारीसारख्या हत्याराने तसेच तलवारीने वार करण्यात आले. यात एका महिलेचा विनयभंग झाला. कासारवाडी येथे सोमवारी (दि. १६) सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार करण्यात आली असून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात अम्रितसिंग लालसिंग गिल (वय ३६, रा. शगुन चौक, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जॉन डॉमनिक फर्नांडीस, मायकल डॉमनिक फर्नांडीस (वय ३२) रोजी डॉमनिक फर्नांडीस (वय ३०, रा. कासारवाडी) यांच्यासह तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी जॉन याला अटक करण्यात आली आहे.
कासारवाडी येथे महामार्गालगत नर्मदेश्वर महादेव मंदिराशेजारी सोमवारी सायंकाळी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली. फिर्यादी गिल यांना त्यांची कासारवाडीतील जागा खाली कर नाही तर तुला आज संपवतो अशी धमकी दिली. शिवीगाळ करून आरडाओरड व दहशत निर्माण केली. आरोपी जॉन याने त्याच्याकडील तलवारीसारख्या हत्याराने मारण्याचा प्रयत्न केला असता फियार्दी गिल यांनी ते हत्यार त्यांच्या हाताने पकडले. त्यावेळी आरोपी मायकल व रोजी व त्यांच्या सोबतच्या इतरांनी फिर्यादी गिल यांना मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या महिलेचा आरोपी मायकल याने विनयभंग केला.
दुसºया प्रकरणात जॉन डॉमनिक फर्नांडीस यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित लालसिंग गिल याच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी जॉन व त्यांचा भाऊ मायकल व रोजमेरी व रोझी अॅॅलन रॉडरिक्स त्यांच्या जागेतून चहाच्या टपरीवरून चहा पिऊन जात होते. त्यावेळी आरोपी गिल आणि इतर आरोपी तेथे आले. तेरा हमेशा का नाटक है तुझे मालूम हैना यह जगह मेरी है, असे म्हणून आरोपी गिल याने फिर्यादीला दमदाटी केली. त्यानंतर तलवारीने वार करून फियार्दीच्या हाताच्या बोटांना जखम केली. यावेळी फियार्दी यांची बहीण रोझी भांडणे सोडविण्यास आल्या असता त्यांना आरोपीच्या हातातील तलवारीची मूठ लागल्याने जखम झाली. तसेच आरोपींनी दगडफेक केली. या फियार्दी व त्यांचा भाऊ मायकल यांच्या डोक्यास मार लागून जखमी झाले.