पिंपरीत दोन गटात हाणामारी ; नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 03:49 PM2019-03-26T15:49:33+5:302019-03-26T15:50:50+5:30

पिंपरी येथे एका हॉटेलमध्ये मंगळवारी(दि.२६) मध्यरात्री दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने वार करण्यात आले.

quarrel in two groups; attack by weopans on son of corporator | पिंपरीत दोन गटात हाणामारी ; नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने वार

पिंपरीत दोन गटात हाणामारी ; नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने वार

Next

पिंपरी : पिंपरी येथे एका हॉटेलमध्ये मंगळवारी(दि.२६) मध्यरात्री दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने वार करण्यात आले. तर नगरसेवकास मारहाण करत दहशत माजवली. तसेच नगरसेवकाच्या गटाने जातीयवाचक शिवीगाळ करुन, बेकायदेशीर जमाव जमवत बेदम मारहाण केली. या बाबत पिंपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. 
 नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी (४९, रा.पिंपरी) यांनी फिर्यादी नुसार सचिन राकेश सौदाई (३२), सनी राकेश सौदाई (२८), सुनील मुकेश शर्मा (२२, रा. सर्व पिंपरी), अजय टाक, तुषार दुलेकर, गोलू व इतर ५ ते ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
तर सचिन राकेश सौदाई (३३, रा. पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नगरसेवक डब्बू आसवानी, लखु भोजवनी, जीजू, आशिष आसवानी, सनी सुखेचा, लखन सुखेचा, भरत आसवानी गुन्हा दाखल केला आहे.
नगरसेवक आसवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सलोनी हॉटेल येथे झाला. सचिन सौदाई याचा वाढदिवस असल्याने आसवानी यांच्या सलोनी हॉटेलमध्ये सौदाई व इतर आले होते. या ठिकाणी हे जबरदस्तीने दारू आणि बियरचे बॉक्स मागवत होते. यास मनाई केल्याने त्यांनी गोंधळ घातला. याची माहिती मिळाल्यानंतर डब्बू आसवानी हॉटेलवर गेले असता पैसे देऊन घेऊन जा असे म्हटल्याने चिडून टोळक्याने राडा केला. टोळक्याने शिवीगाळ करून आसवानी यांचा मुलगा आशिष याला मारहाण केली. त्यावेळी सोडविण्यासाठी गेल्याने डब्बू आसवानी यांनाही मारहाण केली. कोयत्याने वार केले, बाटली फेकून मारली. तसेच पिस्तूलाच्या मागील बाजूने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. 

सचिन सौदाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्याचे मित्र हॉटेल सलोनी येथे गेले होते. त्यावेळी नगरसेवक डब्बू आसवानी यांनी मागील निवडणुकीत मदत न केल्याचा राग मनात धरून जातीयवाचक शिवीगाळ केली. बेकायदेशीर जमाव जमवून वाद घातला. तसेच सिमेंट गट्टू, लाथा बुक्याने तसेच काचेच्या बॉटलने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Web Title: quarrel in two groups; attack by weopans on son of corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.