पत्नी अन् प्रेयसीच्या घरातून रॅकेट, राजस्थान पेपर लीकचा मास्टरमाईंड अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 04:48 PM2022-12-28T16:48:45+5:302022-12-28T16:49:39+5:30

पोलिसांना भूपेंद्र सरनच्या कामकाजाची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली.

Racket through wife and girlfriend, mastermind of Rajasthan paper leak arrested | पत्नी अन् प्रेयसीच्या घरातून रॅकेट, राजस्थान पेपर लीकचा मास्टरमाईंड अटकेत

पत्नी अन् प्रेयसीच्या घरातून रॅकेट, राजस्थान पेपर लीकचा मास्टरमाईंड अटकेत

Next

उदयपूर पोलिसांनीराजस्थानपरीक्षा पेपर लीकप्रकरणातील प्रमुख संशयित आरोप भूपेंद्र सरनच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात बनावट पदवी प्रमाणपत्राच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला. आरोपी भूपेंद्र सरनची प्रेयसी प्रियंकाच्या घरात पोलिसांना अनेक बनावट पदवीचे प्रमाणपत्र सापडले आहेत. यापूर्वी पोलिसांनी भूपेंद्र सरनच्या घरावर छापेमारी केली होती. भूपेंद्र सरनच्या माध्यमातून राज्यभरात बोगस पदवी प्रमाणपत्राचं रॅकेट चालवण्यात येत होतं. एका घरी पत्नी आणि दुसऱ्या घरात प्रेयसीच्या माध्यमातून हे रॅकेट सुरू होत. 

पोलिसांना भूपेंद्र सरनच्या कामकाजाची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली. त्यानंतर, त्याची प्रेयसी प्रियंकाच्याही घरावर छापा मारला. याप्रकरणी पोलिसांनी भूपेंद्र सरनच्या ४ सहकाऱ्यांसह ६ जणांना अटक केली आहे. राजस्थान पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सामान्य ज्ञान ग्रुप ए चाही पेपर लीक झाला होता. त्यामुळेच, गत शनिवारी राजस्थान लोकसेवा आयोगाच्या सामान्य ज्ञान विषयाच्या शिक्षक पदाच्या परीक्षेला रद्द करण्यात आले.  

आरपीएससी परीक्षेचा द्वितीय श्रेणीचा पेपर २०२२ सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर लीक झाला होता. त्यामुळे, अधिकाऱ्यांना हा पेपर रद्द करावा लागला. २४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत ही परीक्षा घेण्यात येणार होती. आरपीएससी परीक्षेच्या द्वितीय श्रेणीचा पेपरसाठी उपस्थित होणाऱ्या उमेदवारांची बस प्रश्नपत्रिका घेऊन जात होती. एका गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी स्पेशल ऑपरेशन ग्रुप्सच्या पथकाद्वारे तपास सुरू केला. त्यावेळी, बकेरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतच ते वाहन पकडून त्यातून कागदपत्रे ताब्यात घेतली. याप्रकरणी ८ महिलांसह ५० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  

Web Title: Racket through wife and girlfriend, mastermind of Rajasthan paper leak arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.