कारंजातील गवळीपुऱ्यात राडा; हाणामारीत १० जण जखमी, परस्परांविरूद्ध तक्रार
By सुनील काकडे | Published: July 27, 2024 06:48 PM2024-07-27T18:48:03+5:302024-07-27T18:48:20+5:30
याप्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही गटांमधील ३५ जणांवर गुन्हा दाखल केला.
वाशिम : शेत रस्त्याच्या कारणावरून कारंजा येथील गवळीपुरा भागात २६ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास मोठा राडा झाला. यावेळी दोन्ही गट एकमेकांविरूद्ध भिडल्याने त्यात १० जण जखमी झाले. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही गटांमधील ३५ जणांवर गुन्हा दाखल केला.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेत रस्त्याच्या कारणावरून वाद होत दोन्ही गट एकमेकांविरुद्ध भिडले. लाकडी काठी, लोखंडी पाईप, कुऱ्हाड, दगड, विटा आदिंनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. त्यात एका गटातील रुक्सार इस्माईल गारवे, नंदा घासी गारवे, सलीम नंदा गारवे, शबनम नंदा गारवे, तर दुसऱ्या गटातील सुभान लल्लू गारवे, रमजान रज्जाक गारवे, रुक्साना रज्जाक गारवे, मुमताज गारवे, तालिफ नौरंगाबादी, युसूफ गारवे जखमी झाले.
याप्रकरणी सुभान लल्लु गारवे (४८) यांच्या फिर्यादीवरुन सलीम गारवे, उस्मान गारवे , इस्माईल गारवे, सोहेल गारवे, चांद गारवे, महेबुब गारवे, फिरोज गारवे, रहिम गारवे, रन्नू गारवे, जुम्मा पप्पूवाले, समीर नौरंगाबादी, तुकड्या नौरंगाबादी, फिरोज गारवे, शमीना गारवे, रुकसार गारवे, जैतून गारवे, अमिना नौरंगाबादी, शमीना नौरंगाबादी, जैतून गारवे, जम्मन पप्पूवाले, फरहान नौरंगाबादी आदिंवर बीएनएसमधील कलम १८९ (२), १९१ (२), १९१(३), १९०, ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या गटाकडून उस्मान गारवे (४२) यांच्या फिर्यादीवरून सुभान गारवे, रज्जाक गारवे, युसूफ गारवे, तालिब नौरंगाबादी, रमजान गारवे, समीर गारवे, जमीर गारवे, हसीना नौरंगाबादी, बीबी गारवे, रुबिना नौरंगाबादी, मुन्नो गारवे, फिरोजा गारवे, रुकसाना गारवे, मुमताज गारवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.