काचेच्या बाटलीत फटाके फोडण्यास विरोध केल्याच्या रागात हत्या; ३ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 06:43 PM2022-10-24T18:43:05+5:302022-10-24T18:45:01+5:30

दोघे जण ताब्यात

Rage killings for opposing the bursting of crackers in glass bottles; 3 Offenses against minors | काचेच्या बाटलीत फटाके फोडण्यास विरोध केल्याच्या रागात हत्या; ३ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा

काचेच्या बाटलीत फटाके फोडण्यास विरोध केल्याच्या रागात हत्या; ३ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा

Next

मुंबई : काचेच्या बाटलीत फटाके फोडण्यास हटकल्याच्या रागात तरुणाची हत्या केल्याची घटना शिवाजीनगरमध्ये घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

शिवाजी नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑकटोबर रोजी दुपारी २ वाजता येथील  नटवर पारेख कंपाउंड येथील मोकळ्या मैदानात १२ वर्षीय मुलगा त्याच्या भाऊ आणि मित्रांसोबत काचेच्या बाटलीत फटाके फोडत होता. यावेळी  सुनील शंकर नायडू (२१) याने त्याला हटकले. याच रागात तिघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच १२ वर्षीय मुलाने जवळील चाकूने नायडुच्या मानेवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्याला स्थानिकांच्या मदतीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. १२ वर्षीय मुलगा पसार झाला असून त्याच्या भावासह मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

Web Title: Rage killings for opposing the bursting of crackers in glass bottles; 3 Offenses against minors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस