सिंहगड इन्स्टिट्युटमध्ये रॅगिंगचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 03:09 PM2018-10-17T15:09:10+5:302018-10-17T15:25:05+5:30

शनिवारी रात्री हा तरुण हॉस्टेलमधील रुममध्ये झोपलेला होता़.तेव्हा पहाटे दीड वाजता त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये शिकणारे व हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सात ते आठ तरुणांनी मुलाच्या डोक्यात आरसा फोडत मारहाण केली.

The ragging case in Sinhagad Institute | सिंहगड इन्स्टिट्युटमध्ये रॅगिंगचा प्रकार

सिंहगड इन्स्टिट्युटमध्ये रॅगिंगचा प्रकार

Next
ठळक मुद्देभाई म्हणायला लावणाऱ्या आठ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखलयाप्रकरणी जळगाव येथील राहणाऱ्या १९ वर्षाच्या विद्यार्थ्याने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद

पुणे : मित्राला झालेल्या मारहाणीविषयी पालकांना आणि हॉस्टेल रेक्टर व प्राचार्यांना सांगण्याचा सल्ला का दिला या कारणावरून सिंहगड हॉस्टेलच्या सात ते आठ तरुणांनी एका मुलाच्या डोक्यात आरसा फोडत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सिंहगड इंजिनियरींग कॉलेजच्या ८ विद्यार्थ्यांविरुद्ध रॅगिंग अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 याप्रकरणी जळगाव येथील राहणाऱ्या १९ वर्षाच्या विद्यार्थ्याने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. ही घटना येवलेवाडी येथील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज हॉस्टेलमध्ये १३ आॅक्टोंबरला रात्री दीड वाजता घडली होती. फिर्यादी तरुणाच्या मित्राला काही जणांनी मारहाण केली होती़. त्याची तक्रार हॉस्टेलच्या रेक्टर व प्राचार्यांकडे कर असा सल्ला या तरुणाने दिला होता़. शनिवारी रात्री आॅक्टोबरला हा तरुण त्याच्या हॉस्टेलमधील रुममध्ये झोपलेला होता़. तेव्हा पहाटे दीड वाजता त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये शिकणारे व हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सात जण त्याच्या रुममध्ये आले़. त्याच्या मित्राला झालेल्या मारहाणीविषयी पालकांना आणि हॉस्टेल रेक्टर व प्राचार्यांना सांगण्याचा सल्ला का दिला या कारणावरून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़. तू पुण्यामध्ये कसा राहतो, तुला संपवून टाकतो, तुला येथून सोडत नाही, अशी धमकी दिली़. त्याला बाहेर जाऊ न देता त्याच्या डोक्यात आरसा फोडून, डोळ्यावर हाताने मारहाण केली़. त्यानंतर त्या तरुणाला सर्वांना भाई म्हणून नमस्कार करायचा अशी धमकी दिली़. त्याला सर्वांसमोर वाकून भाई म्हणायला लावले़. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी ४ जणांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. काळे तपास करत आहेत.

Web Title: The ragging case in Sinhagad Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.