Raghunath Kuchik, Rape Case: तिला दुसरी पूजा चव्हाण होऊ देऊ नका; शिवसेना नेत्याचा फोटो टाकत चित्रा वाघ यांची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 12:57 PM2022-03-14T12:57:22+5:302022-03-14T12:57:48+5:30
Raghunath Kuchik, Rape Case: पीडित मुलीने फेसबुकवर पोस्ट टाकत माहिती दिली आहे. त्यात तिने लिहिले आहे ,की मी स्वतःला संपवत आहे. तिने जर तिच्या जीवाच काही बारवाईट केलं तर त्याची जबाबदारी कुचिकसह पुणे पोलीस प्रशासन व राज सरकाराची आहे, असेही वाघ म्हणाल्या.
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक (raghunath kuchik) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊनही जामीन मिळाला. पोलिसांनी न्यायालयात केस लावून का धरली नाही?, असा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (bjp chitra wagh) यांनी केला होता. आज त्यांनी आणखी एक व्हिडीओ जारी करत कुचिक हे पिडीतेला केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे.
'मी अत्यंत व्यथित होऊन हा व्हिडीओ करत आहे. शिवसेनेचे पुण्याचे नेते रघुनाथ कुचिक, यांना राज्यमंत्री पदाचा दर्जाही दिलेला आहे. अश्या बलात्काऱ्याने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर जबरदस्तीने त्या मुलीचा गर्भपात केला. याबाबत त्या पीडित मुलीने समोर येऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या. एवढ्या गोष्टी, पुरावे असतानाही त्याला जामीन कसा काय मिळतो माहीत नाही', अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली.
जामीनावर बाहेर असलेल्या या आरोपीकडून पीडितेवर दबाव निर्माण केला जात आहे. ही केस मागे घे म्हणून मेसेजेस तिला करतोय. हे मेसेजेस कुणाला दाखवायचे त्यांना दाखव मला काही फरक पडत नाही, अशी धमकी ही त्या मुलाला दिली जातेय, असा आरोप वाघ यांनी केला. याचबरोबर त्याच्यामागे त्याचा कर्ताकरविता धनी कोण आहे. याबाबत पीडित मुलीने फेसबुकवर पोस्ट टाकत माहिती दिली आहे. त्यात तिने लिहिले आहे ,की मी स्वतःला संपवत आहे. तिने जर तिच्या जीवाच काही बारवाईट केलं तर त्याची जबाबदारी कुचिकसह पुणे पोलीस प्रशासन व राज सरकाराची आहे, असेही वाघ म्हणाल्या.
याचबरोबर ही मुलगी जिवंत आहे, तिला वाचवा. तिची पूजा चव्हाण होऊ देऊ नका, अशी विनंतीही चित्रा वाघ यांनी केली आहे.