राहुल शेट्टी खून प्रकरणी दोन जणांना पोलीस कोठडी; अन्य संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 12:38 AM2020-10-28T00:38:24+5:302020-10-28T00:39:40+5:30

शेट्टी यांच्या खूनप्रकरणी लोणावळा शहरातील पाच जणांसह एका अज्ञात‍च्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rahul Shetty murder case: Two remanded in police custody; other suspects were arrested | राहुल शेट्टी खून प्रकरणी दोन जणांना पोलीस कोठडी; अन्य संशयित ताब्यात

राहुल शेट्टी खून प्रकरणी दोन जणांना पोलीस कोठडी; अन्य संशयित ताब्यात

Next

लोणावळा : लोणावळा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल उमेशभाई शेट्टी यांच्या खूनप्रकरणी लोणावळा शहरातील पाच जणांसह एका अज्ञात‍च्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमावरी दोन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना आज न्यायालयाने 31 आँक्टोबर पर्यत पोलीस कोठडी दिली आहे.

   राहुल शेट्टी यांच्या पत्नी सौम्या राहुल शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोबिन इनामदार (वय 35, रा.भैरवनाथ नगर कुसगाव लोणावळा), कादर इनामदार (वय 33, रा. भांगरवाडी लोणावळा), सुरज अगरवाल (वय 42, रा. वर्धमान सोसायटी लोणावळा), दिपाली भिल्लारे (वय 39, रा. भांगरवाडी लोणावळा), सादीक बंगाली  (वय 44, रा. गावठाण लोणावळा) व एक अज्ञात आरोपी नाव पत्ता माहीती नाही यांच्या विरोधात सोमवारी सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सुरज अगरवाल व दिपाली भिल्लारे यांना अटक करण्यात आली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता 31 आँक्टोबर पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आल्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले.

    लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल उमेश शेट्टी हे सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरा जवळील येवले चहाचे दुकानाशेजारील कट्टयावर बसलेले असताना पूर्व वैमनस्यातून राहूल यांच्या विरोधकांनी त्यांना जिवे ठार मारण्याचा कट रचुन संगनमत करुन अज्ञात हल्लेखोरांना सुपारी देत त्यांचा खून केला. त्यांच्या डोक्यात व तोंडावर बंदुकीतुन गोळ्या झाडुन तसेच धारधार शस्त्राने वार करुन त्यांना जिवे ठार मारले आहे.

    या घटनेची माहिती समजताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्यासह लोणावळा उपविभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत सहा पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना केली आहे. तर अटक आरोपींकडून कसून तपास सुरू आहे. आज दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी लोणावळा शहरात येऊन गुन्ह्यांचा व तपासाचा आढावा घेतला.

Web Title: Rahul Shetty murder case: Two remanded in police custody; other suspects were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.