बनावट कॉल सेंटरवर छापा; गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 09:21 PM2020-02-14T21:21:53+5:302020-02-14T21:25:22+5:30
कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
नवी मुंबई : बजाज फायनान्स कंपनीच्या नावे चालणारे बनावट कॉलसेंटर उघडकीस आले आहे. गरजुंना कर्जाचे अमिष दाखवून विविध शुल्काच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळून कर्ज न देता फसवणूक केली जात होती. याप्रकरणी सहा जणांविरोधात नेरुळ पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरुळ येथील हावरे सेंच्युरियन मॉलमध्ये हे कॉलसेंटर चालवले जात होते. त्याठिकाणावरुन कर्जाचे अमिष दाखवून फसवणुक केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा उपआयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष 1 चे वरिष्ठ निरिक्षक सुभाष निकम, सहायक निरिक्षक राहुल राख, हर्षल कदम यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी संबंधीत ठिकाणी छापा टाकला असता, आतमध्ये दोन मुले व फोन करण्यासाठी नेमलेल्या चार मुली आढळून आल्या.
त्यांच्याकडून नागरीकांना फोन करुन वेगवेगळ्या गोष्टीसाठी बजाज फायनान्सचे कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवले जात होते. त्याकरिता वापरले जाणारे सहा फोन देखिल पोलिसांनी जप्त केले आहेत. तर ज्या बँक खात्यात हि रक्कम घेतली जायची, त्या खात्याचे एटीएम देखिल त्यांच्याकडे आढळून आले. सदर बँक खात्याच्या माहितीद्वारे त्यांनी 17 जणांची 3 लाख 49 हजार 516 रुपयांची फसवणुक केल्याचे उघड झाले आहे. ङिाशान शेख व अरविंद जाधव यांच्याकडून हे कॉलसेंटर चालवले जात होते. त्यांनी इरही अनेकांची फसवणुक केल्याचे उघड होण्याची शक्यता आहे. त्यानुसार या टोळी विरोधात नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.