एरंडोल येथे जुगार अड्ड्यावर धाड; दहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 13:11 IST2020-11-26T13:11:27+5:302020-11-26T13:11:48+5:30
एक लाखाच्या रोख रकमेसह दहा दुचाकी जप्त

एरंडोल येथे जुगार अड्ड्यावर धाड; दहा जणांना अटक
जळगाव : नाशिक येथील विभागीय पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकून दहा जणांना अटक केली. आरोपींकडून एक लाख रुपये रोख व दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गुरुवारी भल्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास एरंडोलनजीक एका लिंबूच्या बागेत ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये स्वप्नील मुरलीधर पाटील, मच्छिंद्र नारायण महाजन, सुनील नाना पाटील, रफीक खान याकूब खान, पंढरी खुशाल पाटील, शांताराम राजाराम महाजन, अमित लक्ष्मण परदेशी, गुलाब महादू पाटील, सिद्धार्थ हिम्मत सिंग परदेशी, राजेश मोतीराम पाटील यांचा समावेश आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांनी फिर्याद दिली. त्यावरुन एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.