तळेगाव एमआयडीसी येथील लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा; दोन तरुणींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 09:02 PM2020-10-29T21:02:13+5:302020-10-29T21:03:15+5:30

जॉन प्रकाश राव हा त्याच्या लॉजवर महिलांकडून जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय करून घेत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली..

Raid on lodge for prostitution business at Talegaon MIDC; Release of two young women | तळेगाव एमआयडीसी येथील लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा; दोन तरुणींची सुटका

तळेगाव एमआयडीसी येथील लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा; दोन तरुणींची सुटका

Next
ठळक मुद्देसामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई;  दोघांवर गुन्हा

पिंपरी : तळेगाव एमआयडीसी येथे एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी (दि. २८) ही कारवाई केली.

जॉन प्रकाश राव ऊर्फ आण्णा, एजंट नामे सागर (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्याविरुध्द तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जॉन प्रकाश राव हा त्याच्या लॉजवर महिलांकडून जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय करून घेत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला लॉजमध्ये पाठवले. त्याने रूम बुक केली असता एक मुलगी ही त्याच्या रूममध्ये आली. त्यावेळी सामाजिक सुरक्षा पथकाने लॉजवर छापा टाकला. यात २४ आणि २१ वर्षीय अशा दोन तरुणींची सुटका करण्यात आली.

सामाजिक सुरक्षा पथकाचे विशेष अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सहाय्यक फौजदार विजय कांबळे, कर्मचारी सुनिल शिरसाट, भगवंता मुठे, अनिल महाजन, अमोल शिंदे, वैष्णवी गावडे, मारुती करचुंडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे यांनी केली आहे.

Web Title: Raid on lodge for prostitution business at Talegaon MIDC; Release of two young women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.