प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा यांच्या घरावर छापेमारी; ५० हून अधिक पोलिसांचे पथक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 04:54 PM2021-07-02T16:54:10+5:302021-07-02T16:54:36+5:30
Raid on munawwar Rana's house : रायबरेली पोलिसांनी लखनऊ पोलिसांच्या मदतीने मुन्नवर राणा यांच्या घरावर छापा टाकला.
काल रात्री रायबरेली पोलिसांनी प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात मुनावर राणा यांच्या मुलीने पोलिसांवर अत्याचार केल्याचा आरोप केला. रायबरेली पोलिसांनी लखनऊ पोलिसांच्या मदतीने मुन्नवर राणा यांच्या घरावर छापा टाकला. राणा यांची मुलगी सुमैया हिने पोलिसांच्या या छापेमारीबाबत असंतोष व्यक्त केला आहे.
प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचा मुलगा तबरेज राणा यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी रायबरेली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिस तपासणीनुसार, राणा यांच्या मुलाने काका आणि चुलतभावांना गोवण्यासाठी स्वत: वर गोळी झाडून घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाच्या मागे मालमत्तेचा वाद सांगितला जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. दुसरीकडे, टीव्ही ९शी बोलताना मुनव्वर राणा म्हणाले की, पोलिसांच्या तपासाला मला हरकत नाही, त्यांनी येऊन चौकशी करावी. पण मला दहशतवाद्यासारखे वागवले जाऊ नये. पोलिसांनी तबेरेजला नोकरीवरून काढून टाकले की नाही याचा तपास केला पाहिजे, परंतु मध्यरात्री माझ्या घरी सर्च वॉरंटशिवाय गुंडांसारखे वागणे, महिला व मुलांचे फोन हिसकावणे आणि गैर कृत्य करणे पूर्णपणे चुकीचे आहे. माझ्यावर आरोप करणारे रायबरेलीचे लोक माझ्या तुकड्यावर वाढत असत.
२९ जून रोजी, उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यातील सदर कोतवाली परिसराच्या त्रिपुला चौकात, दुचाकीस्वारांनी प्रख्यात शायर मुन्नवर राणा यांचा मुलगा तबरेज राणा यांच्या कारवर हल्ला केला आणि गोळ्या झाडल्या. वास्तविक, त्रिपुलाच्या पेट्रोल पंपावर दुचाकीस्वारांनी दोन राउंड झाडल्या. दोन्ही गोळ्या तबरेज राणा यांच्या कारला लागली होती. मात्र, गोळीबारानंतर दोन्ही आरोपी पळून गेले.
सुप्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यूपीमधील रायबरेलीचे असून गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबासमवेत लखनऊमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा तबरेज राणा देखील लखनऊमध्ये त्याच्याबरोबर राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी तबरेज कारने लखनऊला जात होता. जाताना पेट्रोल पंप पाहून तो गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गाडीतून बाहेर आला होता.