बनावट ग्राहक पाठवून कुंटणखाण्यावर धाड़, दोन पीडितांची सुटका

By रूपेश हेळवे | Published: September 1, 2022 10:38 PM2022-09-01T22:38:46+5:302022-09-01T22:39:33+5:30

होटगी रोडवरील मोहिते नगर परिसरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली

Raid on Kuntankhana by sending fake customers, two victims rescued in solapur | बनावट ग्राहक पाठवून कुंटणखाण्यावर धाड़, दोन पीडितांची सुटका

बनावट ग्राहक पाठवून कुंटणखाण्यावर धाड़, दोन पीडितांची सुटका

googlenewsNext

सोलापूर : शहरातील मोहिते नगर परिसरातील पत्राच्या घरामध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने छापा टाकून दोन पीडितांची सुटका केली तर याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्व आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

होटगी रोडवरील मोहिते नगर परिसरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून धाड टाकली. त्यात आरोपी रेखा शिवाजी काळे ( वय ४५, रा. विजापूर रोड), आकाश महादेव सावंत ( वय २५, रा. मोहिते नगर), अभिजीत गोपाळ घाडगे ( वय २८, रा. मोहिते नगर ), घर मालकीण हिराबाई महादेव सावंत ( वय ६६, रा. मोहिते नगर परिसर) व दोन पीडिता आढळल्या. पोलीसांनी वरील आरोपींना अटक करून दोन पीडितांची सुटका केली. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरिक्षक विजयालक्ष्मी कुर्री व पथकातील पोलीस नाईक रमादेवी भुजबळ, राजेंद्र बंडगर, सत्तार पटेल, महादेव बंडगर, मुजावर, मंडलिक, उषा माळगे, सिमा खोगरे, शैला चिकमळ, अरूणा परब, गोरे यांनी केली.
 

Web Title: Raid on Kuntankhana by sending fake customers, two victims rescued in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.