कोचिंग सेंटरवर छापेमारी; ५५५ विद्यार्थी सापडले विनामास्क; मालकाला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 09:12 PM2021-05-25T21:12:33+5:302021-05-25T21:13:20+5:30
Raids on coaching center : सुमारे २१५ कि.मी. अंतरावर असलेल्या या कोचिंग सेंटरवर रविवारी छापा टाकण्यात आला आणि त्याचा मालक जयसुख संखलवा याला सोमवारी अटक करण्यात आली.
अहमदाबाद - गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील जसदान शहरात एका कोचिंग सेंटरवर छापा टाकण्यात आला. या कोचिंग सेंटरमध्ये ५०० हून अधिक विद्यार्थी विनामास्क आढळल्याने कोविड -१९ नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोचिंग सेंटरच्या मालकास अटक करण्यात आली. राजकोटचे पोलिस अधीक्षक बलराम मीणा यांनी सोमवारी सांगितले की, येथून सुमारे २१५ कि.मी. अंतरावर असलेल्या या कोचिंग सेंटरवर रविवारी छापा टाकण्यात आला आणि त्याचा मालक जयसुख संखलवा याला सोमवारी अटक करण्यात आली.
पोलिस अधीक्षक बलराम मीणा म्हणाले, "कोविड -१९ नियमांमधील पोलिस सूचनेचा भंग केल्याबद्दल त्यांना साथीच्या रोग कायद्यातील तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे." त्याच्या निष्काळजीपणामुळे हा संसर्ग पसरला असता. मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. '
शाळांच्या प्रवेश परीक्षेची तयारी करते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संखलवा जवाहर नवोदय विद्यालय आणि बालचंडी सैनिक शाळा प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सेंटर कम वसतिगृह चालवतात.
५५५ विद्यार्थी विनामास्क आणि सोशल डिस्टन्सशिवाय ट्यूशन घेत होते
जसदानचे पोलिस उपनिरीक्षक जे.एच. सिसोदिया म्हणाले, “एका गुप्त माहितीच्या आधारे आम्ही कॅम्पसमध्ये छापा टाकला आणि 9-10 या वयोगटातील ५५५ विद्यार्थी तिथे शिकवणीसाठी हजर असल्याचे आढळले. ही मुले ना मास्क लावून होती ना एकमेकांत सोशल डिस्टन्स ठेवून होती.
दुचाकीत पेट्रोल भरले अन्... मित्राच्या भेटीला निघालेल्या दुचाकीस्वाराला एका भरधाव वाहनाने चिरडलेhttps://t.co/qAhXYsWAyM
— Lokmat (@MiLOKMAT) May 25, 2021
कोचिंग मालक म्हणे, पालक यांच्या संमतीने मुले वसतिगृहात आली
कोविड -१९ च्या कारणावरून राज्य सरकारने काही अध्यापनावर बंदी असूनही हे कोचिंग सेंटर सुरू होते. "अटक होण्यापूर्वी कोचिंग मालक जयसुख संखलवा यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांच्या वसतिगृहातील विद्यार्थी १५मे पासून त्यांच्या पालकांच्या संमतीने राहत आहेत.