हातभट्टी अड्ड्यांवर धाडी; लातुरात ४८ जणांना अटक, सव्वा दाेन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Updated: February 17, 2025 00:11 IST2025-02-17T00:10:59+5:302025-02-17T00:11:21+5:30
‘उत्पादन शुल्क’ विभागाने केली धडक कारवाई

हातभट्टी अड्ड्यांवर धाडी; लातुरात ४८ जणांना अटक, सव्वा दाेन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
राजकुमार जाेंधळे, लातूर: जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, हातभट्टी अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाडी टाकल्या आहेत. यामध्ये तब्बल २ लाख २१ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत ४८ जणांना अटक केली असून, ५१ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
लातूर, उदगीर, निलंगा, चाकूर विभागात माेठ्या प्रमाणावर हातभट्टी, अवैध देशी-विदेशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे नांदेड येथील विभागीय उप-आयुक्त बी. एच. तडवी यांच्या निर्देशानुसार अधीक्षक केशव राऊत यांच्या आदेशानुसार १ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत पथकाने विविध ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये हातभट्टी दारू ९४५ लिटर, हातभट्टीसाठी लागणारे रसायन १४०० लिटर, देशी- ११२ लिटर, विदेशी दारू २१ लिटर असा २ लाख २१ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई निरीक्षक आर.एस. काेतवाल, आर.एम. चाटे, आर.व्ही. कडवे, यू.वी. मिसाळ, दुय्यम निरीक्षक आर.डी. भाेसले, एस.आर. राठाेड, एस.के. वाघमारे, बी.आर. वाघमाेडे, व्ही.पी. राठाेड, बी.एल. येळे, एस.डी.घुले, एस.पी. काळे, डी.डी. साळवी, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, नीलेश गुणाले, मंगेश खारकर, षडाक्षरी केंगारे, गजानन हाेळकर, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, साैरभ पाटवदकर, साेनाली गुडले, ज्याेतीराम पवार, श्रीकांत साळुंके, संताेष केंद्रे, कपील गाेसावी, शेन्नेवाड, प्रथमेश फत्तेपुरे, विशाल सुडके, गिरी, भरत गायकवाड, बळी साखरे, ऋषी चिंचाेलकर, शैलेश गड्डीमे, हणमंत माने, हसुले, वडवळे यांच्या पथकांनी केले आहे.