सरकारी अधिकाऱ्याच्या घरी छापा; बायकोने नोटांची बॅग शेजाऱ्यांच्या छतावर टाकली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 11:31 AM2023-06-24T11:31:10+5:302023-06-24T11:51:32+5:30

२०१८ मध्ये राऊत यांना एक पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याकडून १ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली होती

raids on the homes of Odisha government officials; The wife threw the bag of notes on the neighbor's roof | सरकारी अधिकाऱ्याच्या घरी छापा; बायकोने नोटांची बॅग शेजाऱ्यांच्या छतावर टाकली

सरकारी अधिकाऱ्याच्या घरी छापा; बायकोने नोटांची बॅग शेजाऱ्यांच्या छतावर टाकली

googlenewsNext

भुवनेश्वर - ओडिशा पोलिसांच्या दक्षता विभागाने एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली. या छापेमारीत अधिकाऱ्याच्या घरी कोट्यवधीचा खजिना सापडला. अधिकाऱ्याच्या घरी बेनामी संपत्ती असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. छापेमारीत मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने पोलिसांनी संबंधित विभागाला माहिती दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांना या प्रकरणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ज्यावर पोलिसांच्या दक्षता विभागाने जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रशांत कुमार राऊत यांच्या घरी छापा टाकला. टीमने राऊत संबंधित भुवनेश्वर, नबरंगपूर आणि अन्य ठिकाणी धाड टाकली. या छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. 

या कारवाईवेळी अधिकाऱ्याच्या पत्नीने गोंधळात शेजाऱ्यांच्या टेरेसवर नोटांनी भरलेली बॅग फेकली आणि ही बॅग लपवून ठेवण्यास सांगितली. पोलिसांनी शेजाऱ्यांच्या टेरेसवरून ही बॅग जप्त केली. त्यातील रोकड पाहून पोलीस हैराण झाले. त्यांनी नोटा मोजण्यासाठी मशीन मागवली. त्यात तब्बल २ कोटी रुपये होते. प्रशांत कुमार राऊत यांच्या नबरंगपूर येथील घरी सोन्याच्या दागिन्यासह ९० लाख रुपये रोकड जप्त केली. सध्या छापेमारी सुरू आहे. दक्षता विभागाच्या ९ टीमने शोध मोहिम सुरू केली आहे. 

२०१८ मध्ये राऊत यांना एक पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याकडून १ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली होती. त्यावेळी ते सुंदरगड जिल्ह्यात बीडीओ म्हणून कार्यरत होते. राज्यातील एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरी टाकलेल्या छापेमारीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कॅश जप्त केली आहे. याआधी एप्रिल २०२२ मध्ये कार्तिकेश्वर राऊल यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात ३.४१ कोटी रुपये रोकड जप्त केली. जे गंजम जिल्ह्यात लघु सिंचन विभागात सहायक अभियंता म्हणून कार्यरत होते. 
 

Web Title: raids on the homes of Odisha government officials; The wife threw the bag of notes on the neighbor's roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Odishaओदिशा