संतापजनक! रायगड हादरलं, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन नराधमाने केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 17:01 IST2020-07-27T16:59:31+5:302020-07-27T17:01:08+5:30
संबंधीत घटना 26 जुलै राेजी सायंकाळी उशिरा उघडकीस आली याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतापजनक! रायगड हादरलं, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन नराधमाने केली हत्या
रोहा - तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. या संतापजनक घटनेने रायगड हादरले आहे. संबंधीत घटना 26 जुलै राेजी सायंकाळी उशिरा उघडकीस आली याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांर्भिय ओळखून रायगडचे पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अतिरीक्त पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा शाेध घेऊन आराेपीना तात्काळ अटक करा, असे निर्देश त्यांनी रोह्याचे उप पोलीस अधिक्षक किरण सूर्यवंशी यांना दिले. रोहा तांबडी येथील 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली. रविवारी संध्याकाळपासून ही मुलगी बेपत्ता होती. त्यामुळे कुटुंबियांकडून तिचा शोध सुरु होता. सायंकाळी ताम्हणशेत येथील ओहळाजवळ या मुलीचा मृतदेह सापडला. स्थानिकांनी याबाबतची माहिती रोहा पोलिसांना दिली. त्यानंतर पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा रोहा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञाताविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहा - अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या, राेहा तालुक्यातील तांबडी येथील घटना pic.twitter.com/oFkv6hqmet
— Lokmat (@MiLOKMAT) July 27, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु होती देहविक्री
खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार
Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त
'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत
निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का
बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड