रेल्वेच्या विभागीय अभियंत्यास 2 लाखाची तर कार्यालय अधीक्षकालाही 40 हजाराची लाच घेताना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 03:35 PM2021-08-16T15:35:55+5:302021-08-16T15:56:24+5:30
Bribe Case : सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याच्याच कार्यालयात ही धडक कारवाई करण्यात आली.
भुसावळ जि. जळगाव : वर्कऑर्डर देण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची लाच घेताना मध्य रेल्वेचा भुसावळ येथील विभागीय अभियंता एम.एल. गुप्ता व त्याच्या कार्यालयातील मुख्य कार्यालय अधीक्षक संजीव रडे याला ४० हजाराची लाच घेताना सीबीआयच्या पथकाने अटक केली. सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याच्याच कार्यालयात ही धडक कारवाई करण्यात आली.
गेल्या आठ दिवसापासून सीबीआयच्या १८ अधिकाऱ्यांचे पथक भुसावळात तळ ठोकून होते. सोमवारी त्यांनी भुसावळ येथील गुप्ता याच्या कार्यालयात ही कारवाई केली. कारवाई होताच डीआरएम कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास गुप्ता व रडे याच्या घराच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांचे पथक रवाना झाले होते.
लाचखोर गुप्ता याच्या घरातून ५० लाखांची रोकड जप्त
मध्य रेल्वेचा भुसावळ येथील मंडल अभियंता एम.एल. गुप्ता याला दोन लाखाची लाच घेताना अटक केली. या कारवाईनंतर सीबीआयच्या पथकाने गुप्ता याच्या निवासस्थानी धाड टाकली. यात ५० लाख रुपयांची रोकड व काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे.