नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळं ‘तो’ अडकला; ५ महिन्याच्या गर्भवती पत्नीला पोलीस पतीने संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 08:42 AM2021-10-18T08:42:05+5:302021-10-18T08:45:02+5:30

एकेदिवशी अफसर अलीने चुलत भावासोबत मिळून त्याच्या ५ महिन्याच्या गर्भवती पत्नीची हत्या करण्याचा प्लॅन रचला.

Railway Police Husband kills 5-month-pregnant wife in haryana | नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळं ‘तो’ अडकला; ५ महिन्याच्या गर्भवती पत्नीला पोलीस पतीने संपवलं

नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळं ‘तो’ अडकला; ५ महिन्याच्या गर्भवती पत्नीला पोलीस पतीने संपवलं

Next
ठळक मुद्देअफसर अली माझ्या बहिणीचा हुंड्यासाठी छळ करत होता, नजमाच्या भावाचा आरोपअफसर अलीची बरेली येथील रहिवासी नजमासोबत फेसबुकवर भेट झाली. त्यानंतर एकमेकांवर प्रेम जडलंनाईलाजाने अफसरला नजमासोबत लग्न करावं लागलं. परंतु त्यानंतर त्याला तलाक देणं शक्य झालं नाही

यमुनानगर – हरियाणा यमुनानगरमध्ये ५ महिन्याच्या गर्भवती पत्नीची हत्या करण्याच्या आरोपाखाली रेल्वे पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे. पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीने तिच्या अपघाताचा बनाव करत त्याला दुर्घटनेचं रुप देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या चौकशीदरम्यान या घटनेमागे वेगळेच सत्य सगळ्यांसमोर आल्याने मोठी खळबळ माजली. यात आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या जो रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता.

अफसर अली असं रेल्वे पोलीस उपनिरीक्षक आरोपीचं नाव आहे. त्याने ५ महिन्याची गर्भवती पत्नी नजमा हिची चुलत भावासोबत मिळून हत्या केली. या हत्येला रस्ते अपघात असल्याचं बनाव करत पोलिसांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली असता जे समोर आलं ते धक्कादायक होतं. ज्या गाडीने नजमाचा अपघात झाल्याचं दाखवलं होतं ती अफसर अलीच्या यूपी येथील गावातील होती. अफसर अलीच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. हत्याकांडातील इतर आरोपींना लवकरच अटक करू असं पोलिसांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेला उपनिरीक्षक अफसर अलीची बरेली येथील रहिवासी नजमासोबत फेसबुकवर भेट झाली. सुरुवातीला या दोघांमध्ये मैत्री आणि त्यानंतर प्रेम झालं. दोघांनी एकमेकांशी संबंध बनवले परंतु अफसर अलीला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. ही बाब पोलिसांकडे जाऊ नये यासाठी अफसर अलीने २०१९ मजबुरीने नजमासोबत लग्न केले. त्याचवेळी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाकविरोधात कायदा आणला. त्यामुळे अफसर अली नजमाला सोडणं अशक्य झालं.

त्यानंतर एकेदिवशी अफसर अलीने चुलत भावासोबत मिळून त्याच्या ५ महिन्याच्या गर्भवती पत्नीची हत्या करण्याचा प्लॅन रचला. षडयंत्रानुसार, अफसर अली पत्नीला बाहेर फिरण्यासाठी घेऊन गेला. तेव्हा वाटेत स्कोर्पिओ गाडीत आधीपासून वाट पाहत बसलेले अफसर अलीचा भाऊ आणि त्याचे दोन साथीदार यांनी संधी मिळताच नजमाला स्कोर्पिओ गाडीने टक्कर दिली त्यात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. ज्याठिकाणी डॉक्टरांनी नजमाला मृत घोषित केले.

दुसऱ्या लग्नात मिळणार होते ५० लाख

मृत नजमाच्या कुटुंबाला आता न्याय मिळाला आहे. नजमाचा भाऊ मोहम्मद इदरीश म्हणाला की, अफसर अली माझ्या बहिणीचा हुंड्यासाठी छळ करत होता. खोली विकून अफसर अलीला १२ लाख रुपये दिले होते. अफसरला दुसरं लग्न करायचं होतं. त्यासाठी हुंडा म्हणून त्याला ५० लाख मिळणार होते. पोलीस विभागाने चांगले काम करतो म्हणून अफसरला निरीक्षक म्हणून बढती दिली होती. परंतु नजमाच्या तक्रारीनंतर त्याचं डिमोशन करुन त्याला उपनिरीक्षक बनवलं होतं. त्याचमुळे अफसरचा नजमावर राग होता आणि त्याने तिला संपवलं असं नजमाच्या कुटुंबीयांनी सांगितले.  

 

Web Title: Railway Police Husband kills 5-month-pregnant wife in haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस