Love Sex Aur Dhokha: रेल्वेत टीसीसोबत प्रेम जुळले, मंदिरात लग्न, दोन वर्षांनी प्रियकर फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 11:24 AM2021-08-25T11:24:33+5:302021-08-25T11:27:15+5:30
crime news, cheating with girlfriend: पीडितेने सांगितले की, तिची एका तरुणाशी चालत्या ट्रेनमध्ये प्रवासावेळी ओळख झाली होती. मैत्री झाली. ही मैत्री प्रेमात बदलली.
बिहारमधील गयामध्ये लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषनाचा (Molestation) प्रकार समोर आला आहे. प्रेयसी अनेकदा प्रियकराच्या मागे लागूनही त्याने लग्नास नकार दिला. यामुळे पीडिता न्यायासाठी कानपूरच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात पोहोचली. हे लव्ह, सेक्स ओर धोखाचे प्रकरण कानपुरच्या तरुणीसोबत घडले आहे. तर तिचा प्रियकर हा गयाचा राहणारा आहे. (Railway Employee cheat passenger girl, marry in temple, live in relationship, after pregnancy ran away)
लैंगिक संबंध ठेवले म्हणून विवाह बंधनकारक नाही; बलात्कारातील आरोपीला अटकपूर्व जामीन
पीडितेने सांगितले की, तिची एका तरुणाशी चालत्या ट्रेनमध्ये प्रवासावेळी ओळख झाली होती. मैत्री झाली. ही मैत्री प्रेमात बदलली. मग त्याचे येणे जाणे वाढले. एकत्र फिराय़ला जाऊ लागलो. अनेकदा तो मला बाहेर घेऊन गेला. शारीरिक संबंध ठेवले. एक दिवस तो मला मंदिरात घेऊन गेला. तिथे त्याने भांगेत पिंजर भरली आणि म्हणाला की आजपासून तू माझी पत्नी झालीस.
हा तिचा प्रियकर रेल्वेच्या टीटी पदावर कानपूरमध्ये तैनात होता. पीडितेने सांगितले की, आम्ही दोन वर्षे पती-पत्नीच्या नात्याने एकत्र राहिलो. शरीरसंबंधांतून मी गर्भवती झाले. आनंदाने पतीला सांगितले, तर त्याने त्याचा भाऊ आणि भावोजीला बोलवून घेतले. त्यांनी कानपुरच्या दया भग्वी हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने गर्भपात केला.
पीडितेने सांगितले की, एक महिन्यापूर्वी जुलैमध्ये मला मारहाणही केली. त्याने त्याची बदली करून घेतली आणि गयाला गेला. तो दुसरे लग्न करण्याची तयारी करत आहे. मी कानपूर पोलिसांची मदत घेतली आणि जेव्हा पोलिस त्याच्या घरी गेले तेव्हा तो तिथे सापडला नाही. यामुळे मी गयाच्या अधीक्षक कार्यालयात गेले. तिथे तो दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचे सांगितले.
यावर पोलीस एसएसपी आदित्य कुमार यांनी सांगितले की, तरुणीची तक्रार मिळाली आहे. पोलीस आरोपीला पकडण्यासाठी छापेमारी करत आहेत.