रेल्वे प्रवासात मुंबईतील महिला प्रवाशांचे बॅग लंपास, चार लाखांचा ऐवज लुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 08:22 PM2019-07-10T20:22:02+5:302019-07-10T20:25:51+5:30
हेगडे या व्दितीय श्रेणीतील डब्यातून प्रवास करीत होत्या.
मडगाव - रेल्वे प्रवासात मुंबई येथील एका महिला प्रवाशांची बॅग पळवून आतील चार लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास करण्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतल्या मुलुंड येथील कुंदा हेगडे यांनी या प्रकरणी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्या मंगला एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करताना गोवा राज्यातील करमली ते थिवी रेल्वे स्थानक दरम्यान चोरीची ही घटना घडली. हेगडे या व्दितीय श्रेणीतील डब्यातून प्रवास करीत होत्या.
भारतीय दंड संहितेंच्या 379 कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक टी.बी. मडकईकर पुढील तपास करीत आहेत. अज्ञात चोरटयाने प्रवासादरम्यान हेगडे यांचे हॅण्डबॅग पळविले. त्यात एक मोबाईल संच, सोन्याच्या तीन बांगडया, एक नेकलेस, कर्णफुले तसेच चार हजार रोख रुपये होते. या प्रकरणी पोलीस तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.