Raj Kundra Arrest: राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 03:14 PM2021-07-20T15:14:16+5:302021-07-20T15:14:47+5:30

Raj Kundra Arrest : या प्रकरणाचा तपासाचा एक भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली. 

Raj Kundra Arrest : Raj Kundra Raj Kundra remanded in police custody till July 23 | Raj Kundra Arrest: राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी 

Raj Kundra Arrest: राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी 

googlenewsNext
ठळक मुद्देआज राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प (४३)  या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी व्यावसायिक, अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांना कळाली. या प्रकरणाचा तपासाचा एक भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली. 

आज राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प (४३)  या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर दहा आरोपी जामिनावर मुक्त आहेत. 

मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये हे रॅकेट उघड़कीस आणले होते. या  कारवाईत यापूर्वी यास्मीन रसूल बेग खान उर्फ रोवा यास्मीन दीपंकर खासनवीस (४०), प्रतिभा नलावडे (३३), मोहम्मद आतिफ नासीर अहमद उर्फ सैफी (३२), मोनू गोपालदास जोशी (२६), भानुसूर्यम ठाकुर (२६), वंदना रविंद्र तिवारी उर्फ गहना वशिष्ठ (३२), उमेश कामत, दीपंकर खासनवीस (३८) यांना बेड्या ठोकल्या होत्या.

Read in English

Web Title: Raj Kundra Arrest : Raj Kundra Raj Kundra remanded in police custody till July 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.