Raj Kundra Pornography Case : राज कुंद्राला घेऊन गुन्हे शाखेचे पथक पोहचले शिल्पा शेट्टीच्या बंगल्यावर; झाडाझडती सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 06:19 PM2021-07-23T18:19:40+5:302021-07-23T18:30:18+5:30
Raj Kundra Pornography Case: राज कुंद्राच्या न्युफ्लिक्स नावाच्या नवीन अॅप (प्लॅन बी) साठी बनविण्यात येणाऱ्या कराराची कागदपत्रे, काही गहाळ सीडीज आणि १९ प्रौढ व्हिडिओंशी संबंधित गहाळ सर्व्हरही पोलिस शोधत आहेत.
मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा याच्या अडचणी सतत वाढत आहेत. दुसरीकडे, या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता मुंबई गुन्हे शाखेची पथक राज कुंद्रा संदर्भात त्याच्या जुहू येथील बंगला 'किनारा' वर पोहोचली आहे. शिल्पा शेट्टीही या बंगल्यात राहते. राज कुंद्राच्या न्युफ्लिक्स नावाच्या नवीन अॅप (प्लॅन बी) साठी बनविण्यात येणाऱ्या कराराची कागदपत्रे, काही गहाळ सीडीज आणि १९ अडल्ट व्हिडिओंशी संबंधित गहाळ सर्व्हरही पोलिस शोधत आहेत.
अश्लीलतेचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन!
पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राबाबत आता आंतरराष्ट्रीय कनेक्शन चर्चेत येत आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की, व्हॉट्सअॅप चॅटवर त्यांना माहिती मिळाली आहे की, राज कुंद्रा १२१ लाख व्हिडिओ १२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर विकले असल्याचे बोलत आहेत. मुंबई पोलिस म्हणाले की, ही आंतरराष्ट्रीय स्तराची बाब असल्याचे दिसते.
कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले
पोर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून त्यांच्या अटकेला आव्हान दिले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांची अटक बेकायदेशीर आहे. दरम्यान, अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी आणि काही apps द्वारे प्रसारित करण्याच्या खटल्यात उद्योजक राज कुंद्रा याच्या पोलिस कोठडीत मुंबईच्या कोर्टाने शुक्रवारी 27 जुलैपर्यंत वाढ केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती कुंद्रा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलै रोजी रात्री अटक केली होती. यापूर्वी त्याच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.