Raj Kundra : टांगती तलवार कायम! शिल्पा शेट्टीला अद्याप गुन्हे शाखेकडून 'क्लीन चिट' मिळालेली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 07:57 PM2021-07-27T19:57:32+5:302021-07-27T20:18:44+5:30

Raj Kundra : पोलिसांचा असा संशय आहे की, प्रदीप बक्षी (राज कुंद्राचा मेहुणा) फक्त एक चेहरा म्हणून वापरला गेला होता.

Raj Kundra: Shilpa Shetty has not yet been given a clean chit by the crime branch | Raj Kundra : टांगती तलवार कायम! शिल्पा शेट्टीला अद्याप गुन्हे शाखेकडून 'क्लीन चिट' मिळालेली नाही

Raj Kundra : टांगती तलवार कायम! शिल्पा शेट्टीला अद्याप गुन्हे शाखेकडून 'क्लीन चिट' मिळालेली नाही

Next
ठळक मुद्देफॉरेन्सिक ऑडिटर्स नेमले गेले असून  प्रकरणात ते सर्व बँक खात्यांचे व्यवहार तपासून पाहत आहेत असे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. 

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अद्यापही दिलासा मिळालेला नाही. आज राज कुंद्राची पोलीस कोठडी संपल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. राज कुंद्राला किल्ला कोर्टाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. तर कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला अद्याप क्लीन चिट देण्यात आलेली नाही. सर्व शक्यता आणि सर्व बाजू तपासल्या जात आहेत. फॉरेन्सिक ऑडिटर्स नेमले गेले असून  प्रकरणात ते सर्व बँक खात्यांचे व्यवहार तपासून पाहत आहेत असे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. 


पोलिसांचा असा संशय आहे की, प्रदीप बक्षी (राज कुंद्राचा मेहुणा) फक्त एक चेहरा म्हणून वापरला गेला होता. परंतु हॉटशॉट्सची सर्व कामे स्वत: कुंद्रा यानेच पाहिली. त्याच्या अटकेनंतर इतर बळी पडलेल्यांनी पोलिसांकडे जाऊन जबाब नोंदवले असल्याची माहिती या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

आरोपी अरविंद श्रीवास्तव उर्फ यश ठाकूर याची बँक खात्यात जवळपास ६ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आढळून आली. त्याने मुंबई पोलिसांना पत्र लिहिले आहे, खाती गोठवण्याची विनंती केली आहे. पण पोलिसांनी त्यास प्रथम हजर राहावे व चौकशीत सहभागी होण्यास सांगितले आहे. 

 

 

Web Title: Raj Kundra: Shilpa Shetty has not yet been given a clean chit by the crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.