राज कुंद्राच्या अटकपूर्व जामिनावर २ ऑगस्टला सुनावला जाणार आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 03:38 PM2021-07-30T15:38:47+5:302021-07-30T15:40:03+5:30
Raj Kundra : मुंबई सत्र न्यायालयाने राज कुंद्रा यांच्या 2020 च्या महाराष्ट्र सायबर विभाग प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी वेळेच्या कमतरतेमुळे पुढे ढकलली आणि 2 ऑगस्ट रोजी याबाबत निकाल सुनावण्यात येईल.
पोर्नोग्राफी फिल्म्सची निर्मिती संदर्भात मुंबई गुन्हे शाखेने १९ जुलै रोजी अटक केल्यानंतर राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. ४५ वर्षांच्या या व्यावसायिकाने सायबर विभागाच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता आणि सत्र न्यायालयाने सोमवारी या अर्जावरील आदेश पुढे ढकलला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, मुंबई सत्र न्यायालयानेराज कुंद्रा यांच्या 2020 च्या महाराष्ट्र सायबर विभाग प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी वेळेच्या कमतरतेमुळे पुढे ढकलली आणि 2 ऑगस्ट रोजी याबाबत निकाल सुनावण्यात येईल.
Mumbai Sessions court will pronounce its order in the anticipatory bail application of Raj Kundra in the Maharashtra Cyber department case of 2020.
— ANI (@ANI) July 30, 2021
The order will be pronounced on 2nd August. The court adjourned the order due to a paucity of time today. pic.twitter.com/a2mWBnwUxJ
सायबर पोलिसांनी विविध प्लॅटफॉर्मवर एफआयआर नोंदवल्यानंतर राज कुंद्राने जामिनासाठी अर्ज केला होता, सायबर पोलिस आरोप करतात की, अश्लील सामग्री दाखवण्यात त्याचा सहभाग होता. राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने मुंबई पोलीस अडल्ट चित्रपट रॅकेटची सक्रियपणे चौकशी करत आहेत. या प्रकरणात राज यांची पत्नी शिल्पा शेट्टी यांची देखील चौकशी केली गेली आहे आणि पोर्नोग्राफी तयार करण्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नवरा सहभागी नसल्याचे अभिनेत्रीने आपल्या जबाबात म्हटले आहे. तिने हे देखील नमूद केले की इरोटिका पोर्नपेक्षा वेगळी आहे, ज्याचे वितरण केल्याचा आरोप तिच्या पतीवर केले गेले आहे.
गुरुवारी शिल्पा शेट्टीने विविध प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करण्यात आलेल्या बदनामीकारक आशयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. शिल्पा शेट्टीने पोर्नोग्राफी प्रकरणात 'तिची प्रतिमा चुकीची दाखवली' आणि 'तिची प्रतिमा खराब करणं' यासाठी 29 मीडिया कर्मचार्यांची आणि मीडिया हाउसेसची नावे दिली होती. त्यांच्यावर मानहानीचा दावा तिने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे.