लाकुड तोडण्यासाठी गेलेल्या तिघांवर जमावाचा हल्ला; एकाचा मृत्यू दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 09:27 PM2023-08-18T21:27:25+5:302023-08-18T21:27:25+5:30
या धक्कादायक घटनेनंतर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
अलवर-राजस्थानच्या अलवरमध्ये मॉब लिंचिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाकुड तोडण्यासाठी आलेल्या तिघांना 10-12 लोकांच्या जमावाने बेदम मारहाण केली. या घटनेत वसीम नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर इत दोघे गंभीर जखमी आहेत. अलवरमधील नारोल गावाजवळ ही घटना घडली.
बेदम मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले, यानंतर त्यांना कोतपुतली बीडीएम जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. येथे उपचारादरम्यान वसीमचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती वसीम आणि इतर दोघांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी तत्काळ हरसौरा पोलीस ठाणे गाठले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ सील केले असून एफएसएल पथकाने घटनास्थळी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
वसीमचे आजोबा अब्दुल सांगतात की, वसीम झाडांची खरेदी-विक्री करायचा. वसीम त्याच्या काका आणि मामाची मुले आसिफ आणि अजरुद्दीनसोबत रामपूरला झाडे तोडण्यासाठी गेला होता. यावेळी वनविभागाच्या टीमने जेसीबी समोर लावून यांची गाडी अडवली. नारोळाजवळ 7 ते 8 जणांनी लाठ्या-काठ्यांनी तिघांना बेदम मारहाण केली.
वसीमच्या छातीवर शस्त्राने वार करण्यात आल्याचे अब्दुल हुई यांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती हरसौरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळताच पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले आणि तिन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले. वसीमची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कोटपुतली येथे रेफर करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वसीमच्या नातेवाईकांनी 8 ते 10 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.