लॉकर उघडताच बाहेर आल्या 500-500 रुपयांच्या नोटा, शेकडो लॉकर अन्...; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 03:34 PM2023-10-23T15:34:37+5:302023-10-23T15:35:18+5:30

प्लाझा येथील लॉकरमधून 2.46 कोटी रुपये जप्त केले आहेत. लॉकरमध्ये 500 रुपयांच्या नोटा भरल्या होत्या.

rajasthan assembly elections more than rs 2 crore seized from locker of ganpati plaza in jaipur | लॉकर उघडताच बाहेर आल्या 500-500 रुपयांच्या नोटा, शेकडो लॉकर अन्...; नेमकं काय घडलं?

लॉकर उघडताच बाहेर आल्या 500-500 रुपयांच्या नोटा, शेकडो लॉकर अन्...; नेमकं काय घडलं?

राज्यसभा खासदार किरोरी लाल मीणा यांच्या आरोपानंतर आयकर (आयटी) विभागाने रविवारी पुन्हा जयपूरच्या गणपती प्लाझावर छापा टाकला. आयटी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी प्लाझा येथील लॉकरमधून 2.46 कोटी रुपये जप्त केले आहेत. लॉकरमध्ये 500 रुपयांच्या नोटा भरल्या होत्या.

आतापर्यंत IT अधिकार्‍यांनी 761 लॉकर्स तपासले असून, 339 लॉकर्स तपासणे बाकी आहे. आयटी अधिकार्‍यांनी सांगितलं की, मंगळवारी त्यांनी तीन लॉकर तपासले आणि त्यात 1.25 कोटी रुपये रोख आणि 1 किलो सोने सापडलं. शनिवारी आणखी दोन लॉकर्सची तपासणी केली असता त्यात मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली.

या कागदपत्रांच्या आधारे लॉकर मालकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय काही लॉकर आहेत ज्यांचे नाव आणि पत्ता गायब असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. जोपर्यंत सर्व लॉकर मालक येऊन त्यांचे लॉकर उघडत नाहीत तोपर्यंत तपास सुरूच राहणार असल्याचं आयकर अधिकाऱ्यांनी सांगितलं. जयपूरमधील गणपती प्लाझाच्या आत सुमारे 1100 लॉकर्स आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: rajasthan assembly elections more than rs 2 crore seized from locker of ganpati plaza in jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा