निवडणुकीत फ्रॉड करणं पडलं चांगलंच भारी; 'या' भाजपा आमदाराला घडली तुरुंगवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 08:30 AM2021-07-13T08:30:22+5:302021-07-13T08:36:35+5:30
BJP Amritlal Meena News : आमदाराचा जामीन अर्ज फेटाळला असून कोर्टाने तुरुंगात पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली - निवडणुकीत फ्रॉड करणं एका भाजपा नेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. राजस्थानच्या सलूंबरचे आमदार अमृतलाल मीणा (BJP Amritlal Meena) यांनी बनावट मार्कशीट दाखल करुन पत्नीला पंचायत निवडणुकीत उभं केल्याच्या धक्कादायक प्रकार आता समोर आला होता. या आरोपाखाली भाजपा नेत्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. भाजपाचे आमदार अमृतलाल मीणा यांनी पत्नीची खोटी मार्कशीट देऊन पंचायत निवडणुकीचा अर्ज भरला होता. पत्नीची बनावट मार्कशीट दाखवून निवडणुकीचा अर्ज भरल्या प्रकरणात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणात आमदाराचा जामीन अर्ज फेटाळला असून कोर्टाने तुरुंगात पाठविण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमृतलाल मीणा यांना कोर्टाने तीन आठवड्यांपूर्वी सरेंडर करण्यास सांगितलं होतं. मीणा यांनी शनिवारी आरोग्याचं कारण देत कोर्टाकडून वेळ मागितली आणि नंतर ते कोर्टासमोर हजर झाले. येथे सुनावणीदरम्यान कोर्टाने अमृतलाल मीणा यांची जामीन याचिका फेटाळली आणि त्यांना तुरुंगात पाठवलं. सहा वर्षांपूर्वी म्हणजे 2015 मध्ये मीणा यांच्या पत्नी शांतादेवी यांनी सरपंच पदासाठी निवडणूक लढवली होती.
शेतकरी आंदोलकांची भाजपा नेत्यावर दगडफेक, लाठ्या-काठ्यांनी केला हल्ला; पोलिसांनी वाचवला जीव#BJP#BhupeshAggrawal#Farmers#FarmerProtest#Policehttps://t.co/QRcTEV67b1pic.twitter.com/FH9vxI4mkU
— Lokmat (@MiLOKMAT) July 12, 2021
शांता देवीने या निवडणुकीत त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या सुगना देवीचा पराभव केला. मात्र आता निवडणुकीच्या निकालानंतर सरपंच झालेल्या शांता देवी यांच्यावर बनावट मार्कशीटवर निवडणूक लढविल्याचा आरोप झाला आहे. शांता देवी यांच्या मार्कशीटचा तपास करण्यात आला, ज्यात ते प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिसून आलं. या मार्कशीटवर अभिभावक म्हणून शांता देवीचे पती आमदार अमृतलाल मीणा यांचे हस्ताक्षर आहे. या संपूर्ण प्रकरणात भाजपा आमदार अमृतलाल मीणा यांना आरोपी ठरविण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
विकृतीचा कळस! पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे फोटो मॉर्फ करून पॉर्न वेबसाईटवर केले अपलोड#crime#crimenews#Police#TMC#BJP#Politicshttps://t.co/3OlZZyPvJP
— Lokmat (@MiLOKMAT) July 11, 2021
पंजाबमधील भाजपाचे नेते भूपेश अग्रवाल (BJP Bhupesh Aggarwal) आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर शेतकरी आंदोलकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे आहे. अग्रवाल यांच्यावर पटियाला जिल्ह्यातील राजापुरा येथे शेतकरी आंदोलकांनी हल्ला केला आहे. अग्रवाल हे पंजाबच्या पटियालामध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी शेतकरी आंदोलक कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले आणि त्यांनी भाजपा नेता आणि कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यास तसेच लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी वेळीच यामध्ये हस्तक्षेप केल्याने भाजपा नेत्याला या हल्ल्यापासून वाचवण्यात यश आले आहे. मात्र भूपेश अग्रवाल यांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. "500 शेतकऱ्यांनी हल्ला केला, माझ्या जीवाला धोका... हल्ल्याला पोलिसांचं पाठबळ" असा दावा भाजपा नेत्याने केला आहे. भूपेश अग्रवाल यांनी शेतकऱ्यांनी केलेल्या या हल्ल्याला स्थानिक पोलिसांचं पाठबळ असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
...म्हणून महिलेने घेतला टोकाचा निर्णय; धक्कादायक कारण आलं समोर#crime#crimesnews#Deathhttps://t.co/ez5TUJjt1V
— Lokmat (@MiLOKMAT) July 12, 2021