धक्कादायक! ज्याला भाऊ मानायची, त्यानेच महिलेचे 6 तुकडे करुन घराबाहेर पुरले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 02:54 PM2024-10-31T14:54:14+5:302024-10-31T14:54:39+5:30

Rajasthan Crime : आरोपी गुल मोहम्मद फरार असून, पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत.

Rajasthan Crime: woman murdered in Jodhpur, body cut into 6 pieces | धक्कादायक! ज्याला भाऊ मानायची, त्यानेच महिलेचे 6 तुकडे करुन घराबाहेर पुरले...

धक्कादायक! ज्याला भाऊ मानायची, त्यानेच महिलेचे 6 तुकडे करुन घराबाहेर पुरले...

Rajasthan Crime : राजस्थानच्या जोधपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिता चौधरी नावाची 50 वर्षीय महिला दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. पोलिसांना आता तिचा मृतदेह सहा तुकड्यांमध्ये सापडला आहे. आरोपीच्या घराजवळ खोल खड्ड्यात महिलेच्या शरीराचे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत पुरुन ठेवले होते. या घटनेमागे गुल मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा हात असून, तो सध्या फरार आहे. पोलिसांचे पथक सध्या त्याचा शोध घेत आहे.

पत्नीने केला खुनाचा खुलासा 
मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबरला अनिता चौधरी बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती मनमोहन चौधरी यांनी सरदारपुरा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांना अनिताच्या फोनवरुन गुल मोहम्मद नावाच्या व्यक्तीची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी गंगाना गावात आरोपीच्या घराची घडती घेतली. यावेळी गुल मोहम्मदच्या पत्नीने सुरुवातीला माहिती देण्यास नकार दिला, परंतू पोलिसांनी कठोर चौकशी केली असता तिने सांगितले की, तिच्या पतीनेच अनिताची हत्या करून मृतदेह घराच्या मागे पुरला आहे. 

आरोपीला भाऊ अनिता
मृत महिला ही ब्युटीशियन असून स्वतःचे ब्युटी पार्लर चालवत होती. अनिता चौधरी यांच्या मुलाने सांगितले की, गुलॉ मोहम्मदने आपल्या आईची हत्या केली यावर विश्वास बसत नाही. आई गुल मोहम्मदला आपला भाऊ मानत होती. आरोपीचे महिलेच्या कुटुंबाशी खूप चांगले संबंध होते. तो अनेकदा महिलेच्या घरी यायचा. दरम्यान, गुल मोहम्मदने महिलेची हत्या का केली, याचा पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Rajasthan Crime: woman murdered in Jodhpur, body cut into 6 pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.