वडिलांना आणि भावाला घरात कोंडून 5 नराधमांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 08:03 PM2021-10-19T20:03:14+5:302021-10-19T20:03:36+5:30
पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला घरात कोंडले आणि मुलीवर अत्याचार केला. एवढेच नाही, तर यानंतर त्यांनी त्यांच्या 9 बीघा शेतातील पीकही पेट्रोल ( petrol) टाकून पेटवून दिले आहे.
भरतपूर - राजस्थानात सातत्याने गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. यातच आता, भरतपूर येथे सामूहिक बलात्काराची हादरवून सोडणारे घटना समोर आली आहे. भरतपूरमधील एका गावातील व्यक्तीने गावातीलच 5 जणांविरोधात सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. यात, या पाचही जणांनी दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला घरात कोंडले आणि मुलीवर अत्याचार केला. एवढेच नाही, तर यानंतर त्यांनी त्यांच्या 9 बीघा शेतातील पीकही पेट्रोल ( petrol) टाकून पेटवून दिले आहे.
गुन्हा दाखल -
यासंदर्भात बोलताना तपास अधिकारी अनिल मीना म्हणाले, एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील 5 बदमाशांनी त्याच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. यासह त्यांच्या 9 बिघा शेतातील पिकालाही आग लावली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याच बोरब, पूर्वीही या दोन्ही बाजूंच्या लोकांत भांडणे आणि POCSO अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते.
17 ऑक्टोबरची घटना -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 17 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या, पीडितेला सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा सर्व अँगलने तपास केला जात असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. तसेच पीडित पक्षाकडूनही माहिती मिळवली जात आहे. याचबरोबर आरोपींचा शोधही सुरू आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.