पत्नीचा डोळा लागल्यानंतर पती गेला दुसऱ्या खोलीत, मृतदेह आढळला लटकलेल्या अवस्थेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 07:56 PM2022-05-16T19:56:52+5:302022-05-16T19:57:16+5:30
Suicide Case : शिक्षकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पोलीस या प्रकरणात पुढील तपास करीत आहे.
जयपूर : राजस्थानातील टोंक जिल्ह्यात एका सरकारी शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बनेठा भागात राहणाऱ्या शिक्षकाने पत्नीचा डोळा लागल्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन आपलं आयुष्य संपवलं. शिक्षकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पोलीस या प्रकरणात पुढील तपास करीत आहे.
कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत हेमराज रेगर कंवरपुरा गावातील प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते शारिरीक आजारामुळे त्रासले होते. या आजारामुळे ते तणावाखाली आलं होतं. काल रात्री ते आपल्या खोलीत बराच वेळ पत्नीसोबत गप्पा मारत होते. जेव्हा पत्नी गाठ झोपी गेली, तेव्हा दुसऱ्या खोलीत गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली.
पत्नी जागी झाली, तेव्हा पती बेडवर नसल्याचं पाहून ती त्याला शोधण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेली. त्यावेळी तेथे पतीला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला. धक्का बसलेल्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर नातेवाईक धावत आले. यानंतर पतीला खाली उतरवण्यात आलं. पोलिसांच्या चौकशीतून आजारामुळे शिक्षक नैराश्यात गेला होता. यातूनच त्याने आत्महत्येचं पाऊल उचल्याची शक्यता समोर येत आहे.