आईची अवस्था बघून चोराने परत केलं तीन दिवसांआधी चोरलेलं बाळ, रस्त्यावर बॅगेत सापडला चिमुकला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 04:59 PM2021-07-10T16:59:14+5:302021-07-10T17:01:33+5:30
बाडमेरच्या मेडिकल कॉलेजच्या राजकिय चिकित्सालयाच्या पोस्ट ऑपरेटीव्ह वार्डातून ३ दिवसांचं बाळ चोरी गेलं होतं.
राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेरच्या (Barmer) जिल्हा हॉस्पिटलमधून तीन दिवसांआधी चोरी झालेलं तीन दिवसांचं बाळ (Infant Stolen) परत मिळालं आहे. बाळ चोरी गेल्यानंतर आई कमला तीन दिवसांपासून बेशुद्ध होती. कमलाची रडून रडून हालत बेकार झाली होती. गेल्या तीन दिवसांपासून बाडमेरचं पूर्ण हॉस्पिटल चिंतेत होतं. बाळ परत मिळाल्याने आईच्या जीवात जीव आला आहे.
हॉस्पिटलमधून चोरी झालेलं बाळ शोधण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे लोक सगळीकडे फिरत होते. अचानक बाडमेर पोलीस चौकीपासून १०० मीटर अंतरावर रस्त्याने जाणारे एक व्यक्ती रमेश सोनी यांची नजर एका बॅगवर पडली. ज्यात बाळ होतं. त्यांनी हॉस्पिटलच्या स्टाफला याची माहिती दिली. त्यानंतर बाळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
बाडमेरच्या मेडिकल कॉलेजच्या राजकिय चिकित्सालयाच्या पोस्ट ऑपरेटीव्ह वार्डातून ३ दिवसांचं बाळ चोरी गेलं होतं. ज्यानंतर वडील जसराज सिंह यांनी सांगितलं की, सकाळी ५ वाजता त्यांचं बाळ गायब झालं होतं. त्यांनी याची तक्रार नर्स, हॉस्पिटल प्रशासनाकडे केली. पण कुणीही उत्तर द्यायला तयार नव्हतं. नंतर याची माहिती हॉस्पिटलने पोलीस चौकीला दिली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हॉस्पिटलमधील सगळेच सीसीटीव्ही कॅमेरे खराब झालेले होते आणि कुणी गार्डही ड्यूटीवर नव्हता.
पोलीस अधिक्षक आनंद शर्मा म्हणाले की, बाळ दिवसभर बॅगेत नव्हतं तर ते कुणीतरी आणून ठेवलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जात आहे की, कीडनॅपर कोण आहे आणि बाळाला कुठे ठेवण्यात आलं होतं
पोलिसांना वाटतं की, कुणी माहितीतल्याच व्यक्तीने बाळाला किडनॅप केलं होतं. ज्याप्रकारे तिच्या बाळाची हालत खराब झाली होती. ती बघून कदाचित त्याला दया आली असेल किंवा पोलिसांच्या कारवाईला घाबरून बाळा सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला सोडून गेला असेल. डॉक्टरांनुसार, बाळ ठीक आहे. असं वाटतं की, किडनॅपरने बाळाची काळजी घेतली
बाडमेर जिल्हा कलेक्टर लोक बंधुने याप्रकरणी सीएमओकडे रिपोर्ट मागितला. ज्यात प्राथमिकदृ्ष्ट्या असं आढळून आलं की, नर्सच्या बेजबाबदारपणामुळे हे झालं. त्यामुळे तिला सस्पेंड करण्यात आलं. यानंतर नर्सिंग स्टाफमद्ये गोंधळाचं वातावरण होतं. अनेक नर्स रस्त्यावर उतरल्या. अखेर या प्रकरणासाठी कलेक्टरकडून एक कमेटी तयार करण्यात आली आहे.