एक गाडी पुढे अन् एक मागे; प्रसिद्ध युट्यूबर्सचे फिल्मी स्टाईल अपहरण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 01:57 PM2024-07-07T13:57:06+5:302024-07-07T13:57:41+5:30

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

rajasthan-jaipur-youtubers-filmy-style-kidnapping-police-arrest-two-criminals | एक गाडी पुढे अन् एक मागे; प्रसिद्ध युट्यूबर्सचे फिल्मी स्टाईल अपहरण...

एक गाडी पुढे अन् एक मागे; प्रसिद्ध युट्यूबर्सचे फिल्मी स्टाईल अपहरण...

Youtuber Kidnapping :राजस्थानची राजधानी जयपूरमधून अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. सशस्त्र टोळक्याने कारमधून जाणाऱ्या दोन युट्युबर्सचे फिल्मी स्टाईलमध्ये अपहरण केले. सुदैवाने तीन तासांनंतर पोलिसांनी तरुणांची आरोपींच्या तावडीतून सुटका केली आणि दोन हल्लेखोरांनाही ताब्यात घेतले. सध्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्ष आणि हिमांशू, असे या दोन युट्यूबर्स नाव असून, ते दोघे ट्रेडिंग आणि गेमिंग संदर्भातील व्हिडिओ बनवतात. घटनेच्या दिवशी दोघे आपल्या कारमधून जात होते. यावेळी अचानक एक कार त्यांच्या पुढे अन् दुसरी पाठीमागून आली. आरोपींनी आधी या त्यांची गाडी रोखली लाठ्याकाठ्यांनी गाडीची तोडफोड केली. यानंतर त्या दोघांना जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवून फरार झाले. 

आरोपींनी तीन लाख रुपये उकळले
अपहरणानंतर आरोपींनी हर्ष आणि हिमांशूच्या खात्यातून 3 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करुन घेतले. तर, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या तीन तासात दोघांची सुटका केली. तसेच, आरोपी विक्रम सिंह आणि ऋषभ चौधरी यांनाही अटक केली असून, त्यांच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. इतर आरोपी फरार असून, त्यांचाही शोध घेतला जात आहे. 

Web Title: rajasthan-jaipur-youtubers-filmy-style-kidnapping-police-arrest-two-criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.