आता बोला! 'तू काळा आहेस' म्हणत पत्नी पतीला सोडून गेली, पती न्यायासाठी कोर्टाच्या दारात....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 02:16 PM2021-03-12T14:16:56+5:302021-03-12T14:21:59+5:30
Wife harassed husband for his dark complexion : अपमान झाल्यावर या व्यक्तीने मदतीसाठी कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार आता राजस्थान पोलिसांनी पत्नी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
(Image Credit : telegraph.co.uk)
राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात एका व्यक्तीला त्याची पत्नी याकारणाने सोडून गेली कारण त्याचा रंग काळा (Wife harassed husband for his dark complexion) आहे. पतीने आरोप लावला आहे की त्याची पत्नी म्हणाली की, 'तू काळा आहेस, मी तुझ्यासोबत राहू शकत नाही'. पत्नीकडून अशाप्रकारे अपमान झाल्यावर या व्यक्तीने मदतीसाठी कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार आता राजस्थान पोलिसांनी पत्नी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
ही पूर्ण घटना श्रीविजयनगरमध्ये राहणाऱ्या सुमितने कोर्टाच्या माध्यमातून पोलिसात आता पत्नी विरोधात अत्याचाराची केस दाखल केली आहे. सुमितचं लग्न २०१ मध्ये सुमरतीसोबत झालं होतं आणि दोघांना एक मुलगीही आहे. पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, सुमितने पत्नीवर मानसिक, आर्थिक आणि शारीरिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. तो म्हणाला की, त्याचा रंग काळा असल्याने पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास नकार देत आहे. (हे पण वाचा : मुलगी झाल्याने तू अपशकुनी; विवाहितेला दिली क्रूरतेची वागणूक)
सुमितने आरोप लावला आहे की, जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा त्याने कोणतही हुंडा घेतला नव्हता. सुरूवातीला सगळं काही ठीक होतं. पण नंतर पत्नी त्याला काळ्या रंगावरून टोमणे मारणं सुरू केलं. आता ती म्हणते की, काळ्या रंगामुळे तिला त्याच्यासोबत रहायचं नाहीये. इतकेच नाही तर सुमितने पत्नीवर ५० हजार रूपये हडपल्याचा आरोपही लावला आहे. काही दिवसांपूर्वी भावाच्या उपचारासाठी तिने ५० हजार रूपये दिले होते. पण ते पैसे परत करण्यास ते नकार देत आहे. (हे पण वाचा : उंची कमी असल्याने तरूणाला नवरी मिळेना, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणाला - मॅडम, माझं लग्न लावून द्या!)
सुमितनुसार गेल्या महिन्यात ११ तारखेला पत्नीचे पिता आणि तिचे दोन भाऊ त्याच्या घरी आले होते. त्या दिवशी खाण्याच्या पदार्थात नशेचे पदार्थ मिश्रित करण्यात आले होते. त्यानंतर त्याला हात-पाय बांधून मारझोड करण्यात आली. सुमितने आरडाओरड केल्यावर शेजारी आले होते. सुमितने आरोप लावला की, त्याच रात्री त्याची पत्नी २५ हजार रूपये रक्कम आणि दागिने घेऊन घर सोडून गेली