आईच्या नावाचा टॅटू काकाच्या हातावर पुतण्याने पाहिला आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 03:03 PM2021-07-30T15:03:13+5:302021-07-30T15:09:16+5:30

पोलिसांनुसार, काकाच्या हातावर आपल्या आईचं नाव गोंदवलेलं पाहताना आरोपीने त्याच्या डोक्यावर रॉडने प्रहार करून हत्या केली.

Rajasthan : Man killed his uncle businessman Shashi Agrawal in Jaipur | आईच्या नावाचा टॅटू काकाच्या हातावर पुतण्याने पाहिला आणि मग....

आईच्या नावाचा टॅटू काकाच्या हातावर पुतण्याने पाहिला आणि मग....

googlenewsNext

राजस्थानची राजधानी जयपूरमधून हाय प्रोफाइल हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. पोर्ट ब्लेअर येथील व्यापाऱ्याच्या जयपूरमध्ये झालेल्या हत्येच्या केसचा पोलिसांनी खुलासा केला आहे. जयपूरच्या भांकरोटामध्ये ४४ वर्षीय व्यापाऱ्याला त्याच्याच १८ वर्षीय पुतण्याने यमसदनी झाडलं म्हणजे पुतण्याने काकाची हत्या केली होती. पोलिसांनुसार, काकाच्या हातावर आपल्या आईचं नाव गोंदवलेलं पाहून आरोपीने त्याच्या डोक्यावर रॉडने प्रहार करून हत्या केली.

मीडिया रिपोर्टनुसार, ४४ वर्षीय व्यापारी शशी अग्रवालची हत्या त्याच्या १८ वर्षीय पुतण्या राज अग्रवालने केली होती. पोलिसांनुसार मृत शशी आणि आरोपी राजचा परिवार पोर्टब्लेअरमध्ये राहत होता आणि ते तिथेच लोखंडी कपाटाचा व्यवसाय करत होते. राज जयपूरला राहून शिक्षण घेत होता आणि सिरसी रोडवर राहत होता. शशी काही कामानिमित्त जयपूरला आला होता. तेव्हा तो पुतण्यासोबत आणि त्याचा मित्र बंटीसोबत दारूची पार्टी करत होता. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्डची निर्दयीपणे हत्या करून डेडबॉडीवर लिहिला मेसेज, फ्लॅटमध्ये अनेक दिवस ठेवला मृतदेह)

पोलिसांनुसार राजने सांगितलं की, त्याच्या काकाच्या हातावर आपल्या आईचं नाव गोंदलेलं होतं. याचा त्याला राग आला आणि आत जाऊन तो रॉड घेऊन आला. रॉडने काकाच्या डोक्यावर मागून वार केला. रॉडच्या प्रहारामुळे शशीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी राज नुसार, शशीच्या मृत्यूनंतर त्याने आणखी एका मित्राला बोलवलं आणि नंतर यूट्यूबवर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा उपाय पाहिला.

आरोपीच्या हवाल्याने पोलिसांनी सांगितलं की, यानंतर वैशाली नगरला जाऊन आरोपीने मीठ खरेदी केलं आणि मीठ टाकून मृतदेह पॉलिथिनमध्ये पॅक केला. एका टॅक्सी भाड्याने घेतली आणि एका ठिकाणी जाऊन मृतदेह गाडत होता. राजने सांगितलं की, त्याच्या वडिलांचा आणि आईचा घटस्फोट झाला आहे. हे सगळे लोक पोर्ट ब्लेअरमध्ये राहतात. तो काका शशीसोबत पोर्टब्लेअरला जाणार होता. त्याला माहीत होतं की, घरात काकामुळेच त्याच्या आई-वडिलांमध्ये वाद झाले.
 

Web Title: Rajasthan : Man killed his uncle businessman Shashi Agrawal in Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.