महिला आमदाराची दादागिरी! भाच्याची बाईक अडवल्याने पोलिसाच्या कानशिलात लगावली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 12:02 PM2021-06-15T12:02:33+5:302021-06-15T12:10:48+5:30
MLA Ramila Khadiya Allegedly Slaps Head Constable : पोलीस कॉन्स्टेबलने आमदाराच्या भाच्याची बाईक थांबवून त्याला दंड ठोठावल्याचं समोर आलं आहे. याच कारणामुळे संतप्त झालेल्या महिला आमदाराने कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला आमदाराची दादागिरी पाहायला मिळत आहे. महिला आमदारावर हेड कॉन्स्टेबलला (Head Constable) मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पोलीस कॉन्स्टेबलने आमदाराच्या (MLA) भाच्याची बाईक थांबवून त्याला दंड ठोठावल्याचं समोर आलं आहे. याच कारणामुळे संतप्त झालेल्या महिला आमदाराने कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला आमदारावर गुन्हा दाखल केला आहे.
राजस्थानच्या (Rajasthan) बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील महिला आमदार रमिला खरिया यांना आपल्या भाच्याला अडवून दंड ठोठावल्याचा राग आला आणि त्यांनी कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली. महेंद्र नाथ सिंह असं या हेड कॉन्स्टेबलचं नाव असून त्यांनी महिला आमदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हेड कॉन्स्टेबल महेंद्र नाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकाबंदी असल्याने बाईकवरुन जात असलेल्या सुनील बारिया याला पोलिसांनी अडवलं.
कोरोनामुळे प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चौकशी केली जात आहे. मात्र पोलिसांनी बाईक थांबवताच सुनील बारियाला राग आला आणि तो पोलिसांची कॉलर पकडून त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देऊ लागला. यामुळे हेड कॉन्स्टेबलने त्याला दंड ठोठावला आहे. याची तक्रार सुनीलने आमदार रमिला खरिया यांच्याकडे केली. यानंतर संतापलेल्या महिला आमदाराने कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली आहे.
"G-7 बैठकीमधील पंतप्रधान मोदींचं भाषण प्रेरक आणि विडंबनात्मकही"#NarendraModi#PChidambaram#ModiGovernment#politicshttps://t.co/LeoAIntEUapic.twitter.com/qkTUnpfeaw
— Lokmat (@MiLOKMAT) June 14, 2021
महेंद्र नाथ यांनी या प्रकरणी आमदारावर गुन्हा नोंदवण्याविषयी बोलले असता स्टेशन प्रभारी प्रदीप कुमार यांनी त्यांना महिला आमदाराची माफी मागण्यास सांगितले आहे. यावर महेंद्र यांनी नकार दिला. नंतर इतर पोलीस महेंद्रच्या समर्थनार्थ उभे राहिले आणि संपावर गेले तसंच त्यांनी जेवण करण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी आमदाराविरोधात गुन्हा दाखल करून घेतला. सोबतच महेंद्र नाथ विरोधातही केस दाखल करण्यात आली, कारण आमदाराविरोधात तक्रारीचा तपास सीबीसीआयडी करतं, त्यामुळे हे प्रकरण सीबीसीआयडीकडे सोपवण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
माणुसकीला काळीमा! तरुणांनी वृद्धाचं अपहरण केलं, जंगलात नेलं आणि जबरदस्तीने 'जय श्री राम' बोलायला लावलं#Crime#Policehttps://t.co/q4WfrLkA1c
— Lokmat (@MiLOKMAT) June 15, 2021