16 वर्षाने लहान जावयाच्या सासू प्रेमात पडली, सोबत राहू शकले नाही म्हणून आत्महत्या केली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 03:43 PM2022-06-28T15:43:59+5:302022-06-28T15:44:11+5:30

Rajasthan : ही घटना बाडमेर-रामसर मार्गावरील एका गावातील आहे. सकाळी या मार्गावरून लोक जात असताना ही घटना समोर आली. त्यांना दोन मृतदेह लटकलेले दिसले.

Rajasthan mother in law and son in law suicide in love affair | 16 वर्षाने लहान जावयाच्या सासू प्रेमात पडली, सोबत राहू शकले नाही म्हणून आत्महत्या केली

16 वर्षाने लहान जावयाच्या सासू प्रेमात पडली, सोबत राहू शकले नाही म्हणून आत्महत्या केली

Next

राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेरमध्ये जावई आणि सासूचा मृतदेह एका झाडावर लटकलेला दिसला. ज्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. असं सांगितलं जात आहे की, प्रेम प्रकरणातून दोघांनी आत्महत्या केली. ही घटना बाडमेर-रामसर मार्गावरील एका गावातील आहे. सकाळी या मार्गावरून लोक जात असताना ही घटना समोर आली. त्यांना दोन मृतदेह लटकलेले दिसले.

गावातील लोकांनी त्यांना ओळखळं आणि पोलिसांना सूचना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही मृतदेह बाडमेर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवले. सांगितलं जात आहे की, कैरावा येथील 22 वर्षीय होताराम आणि 38 वर्षीय दरिया देवी सासू-जावई होते. एक वर्षाआधीच होतारामचं लग्न खरंटिया गावातील दरिया देवीच्या मुलीसोबत झालं होतं.

मात्र, लग्नानंतर सासू आणि जावयाचं दोघांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. लोकांनाही याची खबर लागली होती. त्यामुळे लोकांना तोंड कसं दाखवायचं म्हणून त्यांनी मृत्यूचा मार्ग निवडला. असं सांगितलं जातं आहे की, दोघेही दुकानात जाण्याच्या बहाण्याने घरातून गेले. नंतर दुसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह दिसून आले.

पोलीस अधिकारी परबत सिंह यांनी सांगितलं की, त्यांना गावातील एका झाडावर दोन मृतदेह लटकलेले असल्याची माहिती मिळाली. लगेच काही पोलिसांना तिथे पाठवलं. मृतदेह ताब्यात घेऊन हॉस्पिटलमध्ये पाठवले. कुटुंबिय येताच मृतेदह पोस्टमार्टम करून त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. अजून याप्रकरणी कोणताही रिपोर्ट दाखल करण्यात आलेला नाही.

Web Title: Rajasthan mother in law and son in law suicide in love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.