धक्कादायक! आधी मोबाईल अॅपमधून अश्लिल चॅट्स, अनेकांना 'भेटायला ये' असं म्हणायची, अन् मग घडायचं असं काही.....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:48 PM2021-03-30T15:48:35+5:302021-03-30T15:53:41+5:30
Crime News : अनेकदा फेसबूक किंवा इंस्टाग्रामवरच्या मुलींवर किंवा मुलांवर विश्वास ठेवून लोक त्याच्या जाळ्यात अडकत जातात.
सोशल मीडियावर प्रत्येकजण नवीन वेगवेगळे मित्र मैत्रिणी बनवत असतो. जर एकमेकांचे विचार पटले, बोलणं आवडलं तर लोक भेटायला सुद्धा जातात. अनेकदा सोशल मीडियावरच्या फेक अकाऊंटमुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. अनेकदा फेसबूक किंवा इंस्टाग्रामवरच्या मुलींवर किंवा मुलांवर विश्वास ठेवून लोक त्याच्या जाळ्यात अडकत जातात. अशीच खळबळजनक घटना समोर आली आहे.
मोबाईल अॅपचा वापरू करून ही मुलगी अश्लील चॅट्स करायची. अनेकदा बोलणं वाढवून पैश्यांची मागणी करत असलेल्या लोकांबद्दल तुम्ही ऐकलं असेल पण हा नवीन प्रकार तुम्हालाही माहीत नसेल. यात सोशल मीडियावर बोलणं वाढवून ही मुलगी मुलांना भेटायला बोलवायची आणि त्यानंतर तिच्या साथीदारांच्या साहाय्यानं मुलाला मारहाण करून लुटून फरार व्हायची.
एटीएम कार्ड लबाडीने घेऊन पैसे लुबाडणाऱ्या सराईत आरोपीला अटक
विशेष म्हणजे आपली बदनामी होईल म्हणून आतापर्यंत एकाही मुलानं याबाबत तक्रार केली नव्हती. आता जयपूरमधील हारामाडा पोलिसांनी या गँगला पकडलं असून आता मोठ्या संख्येनं लोकांना या टोळीबाबत तक्रार केली आहे. पोलिसांनी या तरूणीला तिच्या साथीदारांसह अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ब्लू अॅपचा वापर करून हा कट रचला जात होता.
सीए आत्महत्या प्रकरणाला कलाटणी: ब्लॅकमेल करीत दिड कोटींची रक्कम लुबाडल्यामुळेच वडिलांची आत्महत्या
मुख्य आरोपी ज्योती आणि तिच्या साथीदारांना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून पोलिस आता पुढील तपास करत आहेत. ही तरूणी सुरूवातीला मुलांना आपल्या जाळ्यात अकडवायची त्यानंतर आपल्या साथीदारांसह या मुलांना भेटायला जायची. त्यानंतर तिचे साथीदार भेटायला आलेल्या मुलाकडे असलेला मोबाईल, पाकीट हिसकावून घेत होते. पोलिसांकडून आता लुटमारीचा सामान पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.