कारमध्ये सापडले नोटांचे बंडल; रोकड मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली, पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 09:39 AM2023-09-26T09:39:21+5:302023-09-26T09:39:53+5:30

पोलिसांनी संशय येताच ही कार थांबवण्यात आली. त्यात बसलेल्या युवकांकडून माहिती घेत कारची तपासणी सुरू होती.

Rajasthan Police has seized crores of rupees of cash which was being taken to Gujarat through car | कारमध्ये सापडले नोटांचे बंडल; रोकड मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली, पोलीस हैराण

कारमध्ये सापडले नोटांचे बंडल; रोकड मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली, पोलीस हैराण

googlenewsNext

सिरोही – राजस्थान पोलिसांनी गुजरातला निघालेल्या एका कारमधून कोट्यवधीची रोकड जप्त केली आहे. या कारमध्ये २ युवक होते त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये सिरोहीतून अहमदाबादला घेऊन जात होते. सहा महिन्यापूर्वीही याचठिकाणी पोलिसांनी ३ कोटीहून अधिक रोकड जप्त केली होती. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

राजस्थानच्या सिरोही येथील ही घटना आहे. राज्यात काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी शेजारील राज्यातून येणाऱ्या वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. पोलिसांनी २४ सप्टेंबरला मावळ येथे वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या प्रकाश कुमार आणि विजय सिंह यांची नजर सफेद रंगाच्या लग्झरी कारवर पडली.

पोलिसांनी संशय येताच ही कार थांबवण्यात आली. त्यात बसलेल्या युवकांकडून माहिती घेत कारची तपासणी सुरू होती. यावेळी मागील सीटच्या खाली पोलिसांना नोटांचे बंडल दिसले. ही माहिती स्थानिक पोलीस निरिक्षक सुरेश चौधरी यांना देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या अधिकाऱ्यांनी रोकड जप्त केली. ही रोकड इतकी होती की पोलिसांना ती मोजण्यासाठी मशीन आणावी लागली. पोलिसांनी वाहनातून ३ कोटी १५ लाख रुपये रोकड जप्त केली. त्यानंतर तात्काळ रक्कम सीझ करून दोन्ही युवकांना ताब्यात घेतले.

आरोपींनी सांगितले की, आम्ही गुजरातच्या पाटन येथे राहणारे आहोत. ही रक्कम सिरोहीहून अहमदाबादला घेऊन चाललोय. परंतु ही रक्कम कुठून आणली याचं उत्तर युवकांना देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी नरेश आणि अजित सिंह यांना अटक करून पुढील कार्यवाही सुरू केली. आरोपी हवालाच्या माध्यमातून एवढी रोकड घेऊन जात असून कदाचित एका मोठ्या रॅकेटशी ते जोडले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. सहा महिन्यापूर्वीही पोलिसांनी याच मार्गावर ३ कोटी रुपये जप्त केले होते.

Web Title: Rajasthan Police has seized crores of rupees of cash which was being taken to Gujarat through car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.