धक्कादायक! कैद्याच्या शरीरात सापडले 4 फोन, प्रशासनात खळबळ

By सायली शिर्के | Published: September 20, 2020 10:46 AM2020-09-20T10:46:04+5:302020-09-20T10:51:49+5:30

जोधपूरमधील कारागृहात असलेल्या एका कैद्याच्या पोटात अचानक दुखू लागले. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Rajasthan prisoner complains of pain, X-ray reveals 4 mobile phones in rectum | धक्कादायक! कैद्याच्या शरीरात सापडले 4 फोन, प्रशासनात खळबळ

धक्कादायक! कैद्याच्या शरीरात सापडले 4 फोन, प्रशासनात खळबळ

Next

नवी दिल्ली - राजस्थानच्या जोधपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या एका 32 वर्षीय कैद्याने आपल्या मलाशयात तब्बल चार मोबाईल लपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील कारागृहात असलेल्या एका कैद्याच्या पोटात अचानक दुखू लागले. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

रिपोर्ट पाहून डॉक्टरही झाले हैराण

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देव राम असं या कैद्याचं नाव असून तो गेल्या कित्येक महिन्यांपासून कारागृहात आहे. अचानक त्यांच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी एक्स रे आणि सोनोग्राफी करण्यात आली. रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले कारण कैद्याच्या मलाशयात प्लास्टिक बॅगेमध्ये गुंडाळलेले चार छोटे मोबाईल दिसले. याबाबत कैद्याकडे चौकशी केली असता त्याने मलाशयात फोन लपवून ठेवल्याचं कबूल केलं आहे. 

कारागृहात कैद्याजवळ फोन सापडल्याने खळबळ

कैद्याच्या मलाशयात असलेले हे चार फोन एका शस्त्रक्रियेनंतर आता बाहेर काढण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. काही दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात येईल. कैद्याजवळ फोन सापडल्याने खळबळ उडाली आहे. कारागृहात चार फोन त्याच्याकडे नेमके कसे आले, कोणी दिले ? याबाबत आता चौकशी करण्यात येणार असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : आयोडीनमुळे फक्त 15 सेकंदात कोरोना होणार नष्ट?; रिसर्चमधून 'मोठा' खुलासा

कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाच्या संकटात 'या' शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी घरासमोरच आणली 'शाळा'

CoronaVirus News : आनंदाची बातमी! प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा

"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड?, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला", शेलारांचा टोला

बलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय 

Web Title: Rajasthan prisoner complains of pain, X-ray reveals 4 mobile phones in rectum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.