पत्नीने फिरण्यासाठी मागितले होते पैसे, सैनिक पतीने दिले नाही तर तिने उचललं धक्कादायक पाउल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 06:36 PM2022-03-16T18:36:26+5:302022-03-16T18:48:20+5:30
Rajasthan Crime News : पत्नीने पतीला दिल्लीला फिरायला जाण्यासाठी ५० हजार रूपयांची मागणी केली होती. पतीने पैसे दिले नाहीत. त्यामुळे पत्नीने भावांना बोलवून पतीला मारहाण केली.
Rajasthan Crime News : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात एका पत्नीने भावांसोबत मिळून आपल्या सैनिक पतीला मारहाण केली. पतीला इतकी मारहाण केली की, त्याच्या शरीरात जागोजागी निळे डाग पडले आहेत. पीडित पतीने याप्रकरणी आपली पत्नी आणि तिच्या भावांची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. असं सांगितलं जात आहे की, पत्नीने पतीला दिल्लीला फिरायला जाण्यासाठी ५० हजार रूपयांची मागणी केली होती. पतीने पैसे दिले नाहीत. त्यामुळे पत्नीने भावांना बोलवून पतीला मारहाण केली.
पीडित पती चूनाराम गणेश विद्या मंदिराजवळ शिवकर रोडला राहतो. प्राथमिक चौकशीतून समोर आलं की, काही दिवसांपूर्वीच चूनाराम जाटच्या पत्नीने दिल्ली फिरायला जाण्यासाठी ५० हजार रूपये मागितले होते. पण चूनारामने पैसे देण्यास नकार दिला. याचा पत्नीला राग आला. नंतर तिने भावाना घरी बोलवून पतीला बेदम मारहाण केली. त्याला मारून मारून गंभीर जखमी केलं.
चूनारामने आपली पत्नी आणि मेहुण्यासहीत सासरच्या ४ लोकांविरोधात मारहाण केल्याची पोलिसात तक्रार दाखल केली. पीडित जवानानुसार, त्याची पत्नी, मेहुणा आणि सासरच्या लोकांनी त्याला लोखंडी रॉड आणि बेल्टच्या मदतीने मारहाण केली. चूनारामचा आरोप आहे की, त्याला साधारण ७ ते ८ तास मारहाण करण्यात आली. चूनाराम हा सध्या लेह-लडाखमध्ये तैनात आहे.
पोलीस अधिक्षक दीपक भार्गव यांनी सांगितलं की, सैनिकासोबत बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. पीडित सैनिकाचं मेडिकल बोर्डकडून मेडिकल केलं जाईल. पोलीस पुढील तपास करत आहेत. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.