कुलरच्या थंड हवेत झोपला होता परिवार, बेशुद्ध होण्याचं औषध स्प्रे करून चोरांनी लुटली तीन घरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 04:58 PM2021-10-08T16:58:13+5:302021-10-08T17:22:02+5:30

घरातील सगळेच बेशुद्ध पडल्यावर चोरांनी आरामात घरातील कानाकोपरा बघत चोरी केली. या गॅंगमधील एक चोर जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कुलरमध्ये स्प्रे टाकताना कैद झाला.

Rajasthan : Yamuna nagar spray anaesthesia cooler steals from three houses | कुलरच्या थंड हवेत झोपला होता परिवार, बेशुद्ध होण्याचं औषध स्प्रे करून चोरांनी लुटली तीन घरे

कुलरच्या थंड हवेत झोपला होता परिवार, बेशुद्ध होण्याचं औषध स्प्रे करून चोरांनी लुटली तीन घरे

googlenewsNext

राजस्थानच्या यमुनानगरच्या चौधरी कॉलनीमध्ये गेल्या रात्री तीन घरांमध्ये चोरी झाली. हे तिनही परिवार आपल्या घरात कुलर लावून झोपले होते. चोरांनी फारच हुशारीने कूलरमध्ये बेशुद्ध पडण्याचं औषध स्प्रे केलं. त्यानंतर काही वेळाने संपूर्ण परिवार बेशुद्ध पडला.

घरातील सगळेच बेशुद्ध पडल्यावर चोरांनी आरामात घरातील कानाकोपरा बघत चोरी केली. या गॅंगमधील एक चोर जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कुलरमध्ये स्प्रे टाकताना कैद झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरांचा शोध घेणं सुरू केलं आहे. 

कुलरच्या हवेत झोपलेल्या लोकांनी कल्पनाही केली नसेल की, चोर कुलरलाच त्यांचं चोरीसाठीचं सर्वात मोठं हत्यार बनवेल. चोरांनी आधी कुलरमध्ये बेशुद्ध होण्याचं औषध स्प्रे केलं. मग आरामात घरातील कानाकोपरा पाहत रक्कम आणि किंमती वस्तु घेऊन गेले.

एकानंतर एक या चोरांनी तीन घरांमध्ये अशाचप्रकारे चोरी केली. एका पीडितेने सांगितलं की, चोर त्यांच्याकडचे साधारण ११ हजार रूपये घेऊन गेले. त्यांच्या शेजाऱ्यांचे तर चोर १७ हजार रूपये घेऊन गेले. त्यासोबत त्यांच्या घराच्या मागच्या गल्लीतही चोरी झाली आहे. पीडित महिला रोज सकाळी चार वाजता उठत होती, पण त्या दिवशी तिची झोप ६ वाजता उघडली.

याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना तक्रार मिळाली होती की, चौधरी कॉलनीमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. सर्वाचं मत आहे की, ते जेव्हा सकाळी उठले तेव्हा त्यांचं डोकं दुखत होतं. त्यामुळे सर्वांचं मेडिकलही केलं जाईल.  
 

Web Title: Rajasthan : Yamuna nagar spray anaesthesia cooler steals from three houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.