५०० लोकांना घातला गंडा, जोडप्यानं लढवली वेगळीच शक्कल; ६०० पानांचं आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:30 IST2025-02-01T13:29:29+5:302025-02-01T13:30:03+5:30

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली त्यात आरोप जोडपे दोषी आढळले त्यानंतर कोर्टात त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Rajeev and Rashmi Dubey cheated several elderly people of 35 crore collectively after promising to “reverse their ages | ५०० लोकांना घातला गंडा, जोडप्यानं लढवली वेगळीच शक्कल; ६०० पानांचं आरोपपत्र दाखल

५०० लोकांना घातला गंडा, जोडप्यानं लढवली वेगळीच शक्कल; ६०० पानांचं आरोपपत्र दाखल

कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूर इथं ६५ वर्षावरील नागरिकांना २५ वर्षाच्या तरुणासारखं बनवण्याचं स्वप्न दाखवून एका जोडप्याने फसवणूक केली आहे. जवळपास ५०० लोकांची फसवणूक करून या जोडप्याने ३५ कोटी रुपये हडप केलेत. पोलिसांनी या प्रकरणात ६०० पानांची चार्जशीट कोर्टात दाखल केली आहे. यात आरोपी जोडपे राजीव दुबे आणि रश्मी दुबे यांना कोर्टात हजर करून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यात १४ साक्षीदार बनवले आहेत.

पोलीस निरीक्षक धर्मेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सिजन थेरेपी मशीनची तपासणी झाल्याशिवाय मेडिकल रिपोर्ट येऊ शकत नाही. स्वरूप नगरच्या रेनू सिंह चंदेल यांनी २० सप्टेंबर २०२४ रोजी या प्रकरणी तक्रार नोंदवली. त्यात जोडप्याने अनेक लोकांची फसवणूक करून कोट्यवधी हडप केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली त्यात आरोप जोडपे दोषी आढळले त्यानंतर कोर्टात त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

जीम संचालक राजीव दुबे आणि त्यांची पत्नी रश्मी दुबे हे लग्झरी लाईफ जगतात. त्यांच्यामुळे चांगल्या उच्चभ्रू सोसायटीतील अनेक जण जाळ्यात अडकले. राजीव आणि रश्मी यांनी साकेत नगर भागात रिवाईवल वर्ल्ड नावाची संस्था उघडली होती. हे जोडपे खूप सुंदर आणि हसतखेळत राहत होते. ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक या जोडप्याच्या फसवणुकीला सहजपणे बळी पडले. या जोडप्याने ज्येष्ठांना सांगितले की, आमच्या जीमच्या इमारतीत आम्ही ऑक्सिजन थेरेपीची मशीन लावली आहे. ही मशीन इस्त्रायलहून मागवली आहे. त्यातून आम्ही वृद्धांना युवांप्रमाणे करतो असं सांगून त्यांचा विश्वास संपादन करत होते. 

दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचताच तत्कालीन डीसीपी  यांनी एसआयटीची स्थापना केली. पोलिसांनी त्यांच्या आरोप पत्रात ऑडिओ, व्हिडिओ, फॉरेन्सिक रिपोर्टसह बँक खात्याचे डिटेल्सही पुरावे म्हणून दिले आहेत. विशेष म्हणजे या स्कीमचा प्रचार करण्यासाठी नेटवर्क मार्केटिंगचा वापर करण्यात आला. त्यात अनेक स्कीम लॉन्च केल्या होत्या. टार्गेट पूर्ण करण्यासाठी लोकांना हजार रुपयांपासून लाखो रुपये गिफ्ट देण्यात आले. ६ लाखावर सुटकेस, १२ लाखावर एलईडी टीव्ही, २४ लाखावर लॅपटॉप, ४८ लाखावर आंतरराष्ट्रीय ट्रीप, १.४ कोटीवर छोटी कार अशाप्रकारे अनेक गिफ्ट लोकांना मार्केटिंगसाठी देण्यात येत होते. 

Web Title: Rajeev and Rashmi Dubey cheated several elderly people of 35 crore collectively after promising to “reverse their ages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.