PMC बँक घोटाळाप्रकरणी एचडीआयएलचे राकेश आणि सारंग वाधवानला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 06:12 PM2019-10-03T18:12:46+5:302019-10-03T18:14:22+5:30

आज सकाळपासून दोघांकडे आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु होती.

Rakesh and Sarang Wadhwan of HDIL arrested in connection with PMC bank scam | PMC बँक घोटाळाप्रकरणी एचडीआयएलचे राकेश आणि सारंग वाधवानला बेड्या

PMC बँक घोटाळाप्रकरणी एचडीआयएलचे राकेश आणि सारंग वाधवानला बेड्या

Next
ठळक मुद्देचौकशीमध्ये त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई अन्य आरोपींचा शोध सुरु आज पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलचे राकेश आणि सारंग वाधवानला अटक करण्यात आली आहे.

मुंबई - पीएमसी बँकप्रकरणी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरबीआयच्या प्रशासक यांच्या आदेशावरून जसबीर सिंग मठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आर्थिक गुन्हे विभागाकडे (ईओडब्ल्यू) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार आज पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलचे राकेश आणि सारंग वाधवानला अटक करण्यात आली आहे.
आज सकाळपासून दोघांकडे आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु होती. चौकशीमध्ये त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन यांनी दिली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. मठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पीएमसी या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस आणि अध्यक्ष वरियम सिंग आणि बँकेचे इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल कंपनीचा संचालक वाढवा यांनी २००८ ते २०९ या कालावधीत पीएमसी बँक, भांडुप (प.) या बँकेतील ठराविक कंपन्यांची मोठी कर्ज खाती ज्यामध्ये कर्ज परतफेड होत नसल्याने अनुत्पादक कर्ज (एनपीए) झाली असतानाही त्यांना अनुत्पादक कर्ज घोषित केले नाही आणि त्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक आरबीआयपासून लपवून ठेवली आणि कमी कर्ज रक्कमेच्या बनावट कर्ज खात्यांचा बँकेचा खोटा व बनावट अभिलेख तयार करून आरबीआयला माहिती सादर केली. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रक्कमेचे नुकसान झाल्याचे आढळून आले आणि हा गैरप्रकार झाल्याचे उघड झाले. गैरव्यवहाराचे रक्कमेमध्ये आणि मोठ्या कर्जप्रकरणांपैकी प्रमुख कर्जदार आरोपी असलेली कंपनी हौसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीज असून त्यांनी बँकेच्या पदाधिकारी यांच्याशी संगनमत करून बेकायदेशीररित्या कर्ज प्राप्त करून घेतले आणि परतफेड देखील केली नाही. 

Web Title: Rakesh and Sarang Wadhwan of HDIL arrested in connection with PMC bank scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.