राम कदमांचं बेताल वक्तव्य भोवलं, घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 09:21 PM2018-09-07T21:21:22+5:302018-09-07T21:21:43+5:30

मात्र, बराच वेळ घाटकोपर पोलीस गुन्हा दाखल करून घ्यायला तयार होत नव्हते.

Ram Kadam's statement, complaint filed in Ghatkopar police station | राम कदमांचं बेताल वक्तव्य भोवलं, घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  

राम कदमांचं बेताल वक्तव्य भोवलं, घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  

googlenewsNext

मुंबई - घाटकोपर पोलिसांनी आमदार राम कदम यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या स्नेहा कुराडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. दहीहंडीच्या कार्यक्रमात राम कदम यांनी मुलाला पसंत असेल आणि मुलगी नाही म्हणत असेल तर मुलीला पळवून आणतो असं बेताल विधान केलं होतं. त्यामुळे कदमविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने केली होती. मात्र, बराच वेळ घाटकोपर पोलीस गुन्हा दाखल करून घ्यायला तयार होत नव्हते.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीनं घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केलं होतं. गेल्या 72 तासांपासून हे आंदोलन सुरू होतं. कदम यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करावी अशी मागणी राष्ट्रवादीने लावून धरली होती. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी आज पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यानंतर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्याची तयारी पोलिसांनी दाखवली. कलम 504 नुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीने आपलं आंदोलन मागे घेतलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता हायकोर्टात जाणार असून राम कदम यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करावी अशी मागणी करणार आहे.

Web Title: Ram Kadam's statement, complaint filed in Ghatkopar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.