पंजाब निवडणुकीतील मतदानापूर्वी राम रहिमला २१ दिवसांसाठी दिली जेलमधून सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 02:09 PM2022-02-07T14:09:46+5:302022-02-07T14:10:48+5:30

Ram Rahim out of jail for 21 Days : दोषी कैद्यांना ठराविक कालावधीसाठी रजा मिळते ज्यामध्ये ते त्यांच्या घरी जाऊ शकतात परंतु ते एका निश्चित ठिकाणाव्यतिरिक्त कोठेही येऊ शकत नाहीत.

Ram Rahim out of jail on 21-day furlough before Punjab election 2022 | पंजाब निवडणुकीतील मतदानापूर्वी राम रहिमला २१ दिवसांसाठी दिली जेलमधून सुट्टी

पंजाब निवडणुकीतील मतदानापूर्वी राम रहिमला २१ दिवसांसाठी दिली जेलमधून सुट्टी

Next

चंदीगड - पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम 21 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर आला आहे. बलात्कार आणि हत्येच्या आरोपात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमला २१ दिवसांची रजा मिळाली आहे. पंजाबच्या निवडणुका पाहता याचे अनेक राजकीय संबंधही जोडले जात आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, फर्लो ही एक प्रकारची रजा आहे, ज्यामध्ये दोषी कैद्यांना ठराविक कालावधीसाठी रजा मिळते ज्यामध्ये ते त्यांच्या घरी जाऊ शकतात परंतु ते एका निश्चित ठिकाणाव्यतिरिक्त कोठेही येऊ शकत नाहीत.


यापूर्वी 25 जानेवारीला डेरामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान राम रहीमचे एक पत्र वाचण्यात आले. त्या पत्रात राम रहीमने आपल्या भक्तांना लवकरात लवकर येण्यास सांगून सुट्टीचे संकेत दिले होते. यावेळी डेऱ्याच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. त्यामुळे डेऱ्यात पुन्हा एकदा जुने वैभव पाहायला मिळाले. राम रहीमचे तुरुंगातून आलेले हे 8 वे पत्र होते, जे कार्यक्रमात सर्वांनी वाचले. या पत्रात राम रहीमने लिहिले होते की, जर परमपिता परमात्मा यांची इच्छा असेल तर आम्ही लवकरच तुमचे दर्शन घेऊ आणि पुन्हा एकदा तुमच्यामध्ये उपस्थित राहू.

मुख्यमंत्री म्हणाले - हा योगायोग आहे
दुसरीकडे, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, निवडणुकीपूर्वी राम रहीमला सुट्टी मिळाली असेल तर हा योगायोग आहे. कोणताही कैदी 3 वर्षांच्या निश्चित मर्यादेनंतरच त्याच्या फर्लोसाठी अर्ज करू शकतो. त्यानंतर प्रशासन आढावा घेते आणि त्याच्या कार्यकाळावर निर्णय घेते.

अनेक नेते आले
यादरम्यान पंजाबमधील अनेक राजकीय पक्षांचे उमेदवारही डेरा सच्चा सौदामध्ये पोहोचले. यादरम्यान पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरदुलगढ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि पटियाला ग्रामीणचे पंजाब लोक काँग्रेसचे उमेदवार यांनीही डेरा गाठून लोकांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून पंजाबमधील राजकीय नेते सातत्याने डेरा सच्चा सौदामध्ये पोहोचत आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की डेरात राजकीय लोक नेहमीच हस्तक्षेप करत आले आहेत. खूप मोठी व्होट बँक म्हणूनही याकडे पाहिले गेले आहे.

Web Title: Ram Rahim out of jail on 21-day furlough before Punjab election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.