Ranchi Voilence : माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या?, त्याचा दोष काय?; आईचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 08:04 PM2022-06-12T20:04:02+5:302022-06-12T20:04:36+5:30

Ranchi Violence: या दोघांनाही गोळी लागल्याने रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. झारखंड पोलिसांचे प्रवक्ते अमोल व्ही होमकर यांनी रांची हिंसाचारात 2 मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. 

Ranchi Voilence: Why did my only child get shot ?, what's his fault ?; Mother's angry question | Ranchi Voilence : माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या?, त्याचा दोष काय?; आईचा संतप्त सवाल

Ranchi Voilence : माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या?, त्याचा दोष काय?; आईचा संतप्त सवाल

googlenewsNext

रांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनादरम्यान गोळ्या लागल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी गोळी लागल्याने जखमी झालेल्या मुदस्सीर आलम आणि साहिल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांनाही गोळी लागल्याने रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. झारखंड पोलिसांचे प्रवक्ते अमोल व्ही होमकर यांनी रांची हिंसाचारात 2 मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. 

त्यांनी सांगितले की, रांची हिंसाचाराच्या वेळी आंदोलकांनी गोळीबारही केला होता. यावेळी 12 पोलीस आणि 12 आंदोलक जखमी झाले. एका पोलिसाला गोळी लागली आहे. होमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल 22 जखमींपैकी दोन-तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाकीची प्रकृती ठीक आहे. रांची हिंसाचारात आपला जीव गमावलेल्या हिंदपिरी भागातील मुदस्सीर आलमच्या डोक्यात गोळी लागली होती. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे वडील परवेझ आलम, आई निखत यांची प्रकृती खालावली आहे.

आई-वडील म्हणाले, माझा मुलगा खूप मनमिळावू होता...

रांची हिंसाचारात प्राण गमावलेल्या मुदस्सीरच्या पालकांनी सांगितले की, तो माझा एकुलता एक मुलगा आहे. गरिबीमुळे आम्ही त्याला नीट शिकवू शकलो नाही पण माझा मुलगा खूप मनमिळाऊ होता. त्याला का गोळ्या घातल्या, त्याचा काय दोष होता? मृत मुदस्सीरचे काका मोहम्मद शाहिद हे AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. आपल्या पुतण्याच्या मृत्यूला झारखंड सरकार आणि रांची जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या गोळ्या लागल्याने मुदस्सीरचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. आंदोलक अतिरेकी नव्हते. मग त्यांच्यावर गोळ्या का झाडल्या? पोलिस एके-47 आणि पिस्तुलाने गोळीबार करत असल्याचा आरोप केला.


रांची हिंसाचारात साहिलचा मृत्यू झाला

रांची हिंसाचारात मुदस्सीरशिवाय आणखी एक तरुण साहिलचाही मृत्यू झाला आहे. रिम्स रुग्णालयाच्या व्यवस्थापनानुसार, त्याच्या मूत्रपिंडात गोळी लागली होती, त्यामुळे सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. साहिलच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तो मेन रोडवरील एका दुकानात रोजंदारीसाठी काम करत असे. कामावरून परतत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. निषेध मोर्चात संतप्त लोकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या किंवा रबर गोळ्या सोडण्याऐवजी थेट गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हेमंत सोरेन सरकारवर नाराजी व्यक्त करत गोळीबार करणाऱ्या पोलिसांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात यावी, असे ते म्हणाले.

Web Title: Ranchi Voilence: Why did my only child get shot ?, what's his fault ?; Mother's angry question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.