आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून वकिलाकडे मागितली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 09:20 PM2021-02-13T21:20:00+5:302021-02-13T21:20:39+5:30

Crime News : धक्कादायक : अनोळखी तरुणीविरुध्द गुन्हा दाखल

Ransom demanded from lawyer by showing offensive video by lady | आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून वकिलाकडे मागितली खंडणी

आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून वकिलाकडे मागितली खंडणी

Next

जळगाव : फेसबुकवरील फेन्ड रिक्वेस्ट स्विकारलेल्या वकिलाला तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून त्यांच्याकडे ऑनलाईन खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी ॲड. प्रशांत नाना बाविस्कर (३१, रा.एस.के.रेसीडेन्सी, गणेश कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनिवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुध्द खंडणी व माहीती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ॲड.प्रशांत नाना बाविस्कर यांना त्यांच्या फेसबुक पेजवर एका तरुणीच्या नावाच्या फेसबुक पेजवरून ११  फेब्रुवारी रोजी ११ वाजता फ्रेन्ड रिक्वेस्ट आली. ॲड.प्रशात बाविस्कर यांनी ती स्विकारली केली. त्यानंतर त्या पेजवरून स्क्रिनवर एका आक्षेपार्ह व्हिडिओ पाठविला होता. तो व्हिडीओ प्रशांत हे पाहत असल्याचे भासविल्याचा व्हिडीओ पाठविला होता. वरील बनावट अकाऊंटच्या मोबाईल नंबरवरून ॲड.प्रशांत बाविस्कर यांच्या व्हॉटसॲपवर पाठविला. दरम्यान या व्हिडीओत आपण असल्याचे भासवून प्रशांत यांच्याकडून खंडणी मागितली.

घाबरून ॲड.प्रशांत बाविस्कर यांनी संबंधित अनोळखी व्यक्तीच्या ऑनलाईन ७ हजार ४९९ रूपये पाठविले. दरम्यान,आपली फसवणूक होत असल्याने त्यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे करीत आहे.

Web Title: Ransom demanded from lawyer by showing offensive video by lady

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस